मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर १ जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांना गेल्या काही महिन्यांपासून पायाच्या दुखण्यानं त्रास होत होता. हे दुखणं वाढल्यामुळे उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे ते मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राज ठाकरेंवर हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. पायाचे दुखणे वाढल्याने राज ठाकरे यांना ५ जूनचा अयोध्या दौरा रद्दा करावा लागला होता.
शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती!!
- जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात येणार असल्याची चर्चा होत.
- मात्र पायाचं दुखणं वाढल्यानं शक्य तितक्या लवकर ऑपरेशन करण्याचा सल्ला राज ठाकरे यांना देण्यात आला आहे.
- त्यानुसार राज ठाकरे यांना रुग्णालयात ऑपरेशनच्या एक दिवस अगोदर भरती होण्याचा सल्ला देण्यात आला होता.
- राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
राज ठाकरेंनी दिली शस्त्रक्रियेची माहिती…
- पायाचं दुखणं वाढल्यामुळे आणि वेगवेगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता.
- पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरेंनी आपल्या शस्त्रक्रिया बाबतही सविस्तर माहिती दिली होती.
- राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, मी जेव्हा मागे पुण्यात आलो होतो, तेव्हाच मला पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता.
- जेव्हा मी मुंबईत परतलो तेव्हा काही टेस्ट करण्यात आल्या होत्या.
- या टेस्टनंतर डॉक्टरांनी मला मला हिप बोनचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.
- एक जूनला हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणारे.
- म्हणूनच मी मुद्दामहून तुम्हाला याबद्दल माहिती दिली.
- तुम्हाला न सांगताच शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो तर पत्रकार काहीही सांगू शकतात.