मुक्तपीठ टीम
येत्या पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर मनसे सक्रिय झाली आहे. गेल्याकाही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चेबांधणीचं काम करत आहेत. त्यातही पुणे आणि नाशिक या जुन्या बालेकिल्ल्यांवर त्यांचे खास लक्ष आहे. आता पुण्यात थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय मनसेनं घेतला आहे. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या २४ ऑक्टोबर रोजी पुण्यात मोठं आंदोलन होणार आहे.
राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन
- मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली माहिती.
- आता आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
- मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी या आंदोलनाची माहिती दिली.
- तळजाई टेकडीवर प्रकल्प होत असून या टेकडीवर एक प्रकारचं अतिक्रमणच केलं जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे.
- त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत.
- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या २४ तारखेला हे आंदोलन होणार आहे.
- सकाळी ७ वाजताच या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
तळजाई बचाव अभियान
- दरम्यान, सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे १०७ एकर जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) पुणे मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.
- तळजाई जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला आहे.
- या प्रकल्पामुळे परिसरातील मूळ जैवविविधता नष्ट होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.
- त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करण्यासाठी नागरिकांनी ‘तळजाई बचाव अभियान’ सुरू केले आहे.
- त्याची दखल मनसेनेही घेतली असून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.