Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित! रविवारी राज ठाकरे सविस्तर मांडणार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raj thackeray (7)

मुक्तपीठ टीम

हिंदुत्ववादाची नव्यानं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गाजावाजा झालेला अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. भाजपाचे उत्तरप्रदेशातील दबंग नेते खासदार बृजभूषण शरण यांनी राज ठाकरेंच्या अयोध्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. उत्तर भारतीयांची माफी मागावी, तोपर्यंत त्यांना उत्तरप्रदेशात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात मनसेला उघडपणे हिंदुत्वावर साथ देणाऱ्या भाजपाने स्वत:च्याच खासदाराच्या दंबगगिरीविरोधात मौन बाळगले. त्यामुळे अखेर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्याचे जाहीर केले आहे.

 

#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1

— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022

मिशन अयोध्येनं झाली असती प्रतिमानिर्मिती

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे मनसेसाठी वातावरणनिर्मितीची चांगली संधी होती.
  • भाजपालाही मनसेशी युती करण्यासाठी त्या वातावरणाचा फायदा झाला असता.
  • राज ठाकरेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा पुढे नेत आहे, असा संदेशही या दौऱ्यातून देता आला असता.
  • त्यामुळेच शिवसेनेही आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा जाहीर केला होता.

 

बृजभूषण शरण सिंह यांची राज ठाकरेंविरोधात दबंगगिरी!

  • भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह हल्लाबोल करत आहेत.
  • ते म्हणाले की, राज ठाकरेंनी अयोध्येत येण्याआधी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी.
  • आता त्यांना अयोध्येची आठवण येऊ लागली आहे.
  • तसेच, योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट नाकारावी. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना भेट देऊ नये, असा सल्लाही सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.
  • त्यांनी सातत्यानं राज ठाकरेंचा अतिशय वाईट शब्दात उल्लेख केला.
  • साध्वींनी समजवल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही.

 

उत्तर भारतीयों को अपमानित करने वाले राज ठाकरे को अयोध्या की सीमा में घुसने नहीं दूंगा
अयोध्या आने से पहले सभी उत्तर भारतीयों से हाथ जोड़कर माफ़ी मांगे राज ठाकरे#MNS #RajThackeray #Ayodhya @ANI @ANINewsUP

— BrijBhushan Sharan Singh MP (@sharan_mp) May 5, 2022

कोण आहेत बृजभूषण सरण?

  • बृजभूषण सिंह हे कैसरगंजचे भाजपचे खासदार आहे.
  • बृजभूषण सरण सिंह हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत.
  • यूपी निवडणुकीदरम्यान त्यांनी हिजाब वादावर मोठे वक्तव्य केले होते.
  • ते म्हणाले की, हिजाब ही तालिबानची विचारधारा आहे.
  • ही दहशतवाद्यांची विचारसरणी आहे.
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर भाष्य करताना ते म्हणाले होते की, आज मुस्लिमांकडे ५७ देश आहेत आणि हिंदूंचा एकही देश नाही.
  • गांधीजींनी ते होऊ दिले नाही.
  • देशाच्या शूर सुपुत्रांची नावे इतिहासाच्या पानातून गायब झाली.

Tags: Ayodhya VisitmnsRaj Thackerayअयोध्या दौरामनसेराज ठाकरे
Previous Post

एमपीएससीमार्फत ‘पशुसंवर्धन विभागात’ २९८ जागांवर करिअर संधी

Next Post

अखेर संदिप देशपांडे प्रकटले…प्रथमच १६ दिवस शिवाजी पार्क आणि माध्यमांपासूनही दूर!

Next Post
Sandeep Deshpande Meets Raj Thackeray

अखेर संदिप देशपांडे प्रकटले...प्रथमच १६ दिवस शिवाजी पार्क आणि माध्यमांपासूनही दूर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!