Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरे : एक सभा आणि १५ अटी! काय म्हणतात मनसे नेते?

राज ठाकरे पुण्यातून ३० एप्रिलला औरंगाबादला रवाना होणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray (4)

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी औरंगबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र या सभेसाठी काही अटी या पोलिसांकडून घालण्यात आल्या आहेत. मनसेच्या पाडवा मेळाव्यात झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेवरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या सभेला अनेकांकडून विरोध होत होता. मात्र काही अटी शर्तीनुसार या सभेसाठी परवागनी देण्यात आली आहे. दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी पोलिसांनी घातलेल्या अटींचं पालन केलं जाईल, असं स्पष्ट केलं आहे. मात्र, औरंगाबादच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे पुण्यातून ३० एप्रिलला रवाना होणार आहेत.

एक सभा आणि १५ अटी!

  1. सभा ४.३० ते ९.३० या दरम्यान आयोजित करावी.
  2. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, सभेत कुणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी करु नये.
  3. सभेसाठी १५ हजारहून अधिक लोकांना निमंत्रिक करु नये.
  4. वंश, जात, धर्म, भाषा, प्रदेशावरून चिथावणी देणारं वक्तव्य करू नये.
  5. सभेदरम्यान चेंगराचेंगरी वा गोंधळासारखे प्रकार घडल्यास आयोजक जबाबदार असतील.
  6. सभेमध्ये शस्त्र, तलवारी, स्फोटकं बाळगू नयेत.
  7. कार्यक्रमाचं ठिकाण किंवा वेळ यामध्ये कोणताही बदल करू नये.
  8. पोलिसांनी नेमून दिलेल्या मार्गानंच प्रवास करावा.
  9. सुव्यवस्था राखण्यासाठी मजबूत बॅरिकेट्स उभारावेत
  10. सभेसाठी आवाजाची मर्यादा ७५ डेसिबल इतकी ठेवावी लागणार
  11. कार्यक्रमादरम्यान अत्यावश्यक सुविधांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
  12. सभेच्या दिवसी वाहतुकीसंदर्भातील अधिसूचना सभेला येणारे वक्ते, कार्यकर्ते यांना बंधनकारक असेल
  13. सर्व अटींची माहिती आयोजकांनी कार्यकर्त्यांना द्यावी.
  14. सभेसाठीच्या वस्तू, जनरेटरची व्यवस्था आधीच करावी.
  15. सभेदरम्यान अन्नदान किंवा मिठाई वाटप होणार असेल, तर त्यातून विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.

पोलिसांनी घातलेल्या अटींचं पालन केलं जाईल, पण…

  • मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसांनी घातलेल्या अटींचं पालन केलं जाईल, असं स्पष्ट केलं आहे.
  • आयुक्तांनी जी परवानगी दिली आहे, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद झाला आहे.
  • पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे की त्यांनी घातलेल्या अटींचं नक्कीच पालन केलं जाईल.
  • कायदा-सुव्यवस्था राखणं तुमच्याप्रमाणेच आमचं देखील कर्तव्य आहे.
  • ते नक्कीच पाळलं जाईल, पण येणाऱ्या लोकांना तुम्ही थांबवू शकत नाही, असंही नांदगावकर म्हणालेत.
  • जेवढे लोक येतील, तेवढ्यांना कसं सावरायचं आणि आवरायचं त्याबाबत पोलिसांशी सहकार्याने आम्ही काम करू.
  • शुक्रवारी यासंदर्भात पोलिसांसोबत आमची बैठक आहे.

पोलिसांना सतर्क राहाणं गरजेचं…

  • पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे.
  • आम्ही आमचं काम करणार.
  • त्यापलीकडे काही झालं, तर पोलीस त्यांचं काम करण्यासाठी आहेतच.
  • आम्हाला कोणतीही अट जाचक वाटत नाही.
  • कारण पोलीस जेव्हा केव्हा सभा होतात, त्यासाठी अशाच प्रकारे अटी देतात.
  • कदाचित आमच्या सभेसाठी जास्त अटी असतील.
  • पोलिसांना सतर्क राहाणं गरजेचं असतं.
  • त्या दिवशी प्रचंड कार्यक्रम आहेत.
  • त्यामुळे पोलीस काळजी घेत असतील.

Tags: AurangabadBala NandgaonkarmnsRaj Thackerayऔरंगाबादजाहीर सभाबाळा नांदगावकरमनसेराज ठाकरे
Previous Post

ओएनजीसीत ३ हजार ६१४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

सोशल पॉवर! ‘शिक्षक’ डिलिव्हरी बॉयना मोटर सायकल!

Next Post
सोशल पॉवर! ‘शिक्षक’ डिलिव्हरी बॉयना मोटर सायकल!

सोशल पॉवर! 'शिक्षक' डिलिव्हरी बॉयना मोटर सायकल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!