Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंचं ‘माझं इंजिन मीच चालवतोय’ म्हणजे स्वतंत्र वाटचाल, पण ‘परिस्थितीनुसार’ने वेगळेही संकेत!

राज ठाकरेंनाही कळत नाही मराठा आणि ओबीसी आरक्षण अडलं कुठे?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raj thackeray

मुक्तपीठ टीम

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुण्यातील मनसेच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, खडसे आणि राज्य सरकारच्या कारभारावर भाष्य केले. मराठा आरक्षण असो वा ओबीसी सर्वच पक्षांना मान्य आहे, राज्य आणि केंद्र सरकारलाही मान्य आहे, तर मग मराठा आणि ओबीसी आरक्षण अडलं कुठे, असा प्रश्न त्यांनी विचारला. “सध्या माझं इंजिन मीच चालवतोय” या त्यांच्या विधानामुळे त्यांनी मनसेच्या स्वतंत्र वाटचालीचं धोरण मांडलंय, पण त्यांनी वापरलेला परिस्थितीनुसार हा शब्द हे धोरण बदलूही शकतं हे संकेत देणारा आहे.

 

मराठा आरक्षण सर्वांनाच मान्य तर अडलं कुठं?

  • “राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता.
  • त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती.
  • त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडलं कुठे?
  • फक्त मुद्दा उपस्थित करायचा आणि माथी भडकावायची एवढाच उद्योग आहे का?

 

ओबीसी आरक्षण सर्वांना मान्य तर अडलं कुठे?

  • जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे.
  • ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.
  • ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे तर अडलं कुठे?
  • तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत?
  • एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असं ते म्हणाले.

 

खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय, यंत्रणांचा गैरवापर!

  • एकनाथ खडसे यांच्या कारवाईबद्दल विचारले असता त्यांच्या सीडीची वाट पाहतोय असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
  • यंत्रणांचा गैरवापर होत आहे.
  • काँग्रेसचं सरकार असतानाही गैरवापर होत होता.
  • भाजपचं सरकार असतानाही होत आहे.
  • यंत्रणा काय तुमच्या हातातील बाहुली आहे का?
  • ही काही तुमच्या हातातली बाहुली नाही जिचा वापर तुम्हाला नको असलेला माणूस संपवण्यासाठी करायचा.
  • ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
  • अशाप्रकारे करुन चालणार नाही.
  • ज्यांनी गुन्हे केलेत ते मोकाट सुटले आहेत.

 

सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही-

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर समाधानी आहात का? यावर ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे सरकारचा कारभार पाहता आला नाही.
  • त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करावं? असा सवाल त्यांनी केला.

 

सध्या माझं इंजिन मीच चालवतोय!

  • होय, मनपा निवडणुकांची तयारी सुरू.
  • यावेळी राज यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट केलं.
  • आगामी निवडणुकांमध्ये मनसेचे वातावरण चांगलंच असेल.
  • सध्या माझं इंजिन मीच चालवतोय.
  • निवडणुकांमध्ये परिस्थितीनुसार एकला चलो रे अशी भूमिका राहील, असं राज ठाकरे म्हणाले.

Tags: Eknath KhadseMaratha ReservationOBC reservationpuneRaj Thackerayएकनाथ खडसेओबीसी आरक्षणपुणेमनसेमराठा आरक्षणराज ठाकरे
Previous Post

आधी साखर कारखाना, आता जिल्हा बँका…ईडीची दिशा अजित पवारांकडेच?

Next Post

अमेरिकेच्या ट्रम्पनाही नडणारं ट्विटर मोदी सरकारपुढे का नमलं?

Next Post
twitter (3)

अमेरिकेच्या ट्रम्पनाही नडणारं ट्विटर मोदी सरकारपुढे का नमलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!