मुक्तपीठ टीम
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुण्यातील मनसेच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, खडसे आणि राज्य सरकारच्या कारभारावर भाष्य केले. मराठा आरक्षण असो वा ओबीसी सर्वच पक्षांना मान्य आहे, राज्य आणि केंद्र सरकारलाही मान्य आहे, तर मग मराठा आणि ओबीसी आरक्षण अडलं कुठे, असा प्रश्न त्यांनी विचारला. “सध्या माझं इंजिन मीच चालवतोय” या त्यांच्या विधानामुळे त्यांनी मनसेच्या स्वतंत्र वाटचालीचं धोरण मांडलंय, पण त्यांनी वापरलेला परिस्थितीनुसार हा शब्द हे धोरण बदलूही शकतं हे संकेत देणारा आहे.
मराठा आरक्षण सर्वांनाच मान्य तर अडलं कुठं?
- “राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता.
- त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती.
- त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडलं कुठे?
- फक्त मुद्दा उपस्थित करायचा आणि माथी भडकावायची एवढाच उद्योग आहे का?
ओबीसी आरक्षण सर्वांना मान्य तर अडलं कुठे?
- जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे.
- ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.
- ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे तर अडलं कुठे?
- तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत?
- एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असं ते म्हणाले.
खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय, यंत्रणांचा गैरवापर!
- एकनाथ खडसे यांच्या कारवाईबद्दल विचारले असता त्यांच्या सीडीची वाट पाहतोय असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
- यंत्रणांचा गैरवापर होत आहे.
- काँग्रेसचं सरकार असतानाही गैरवापर होत होता.
- भाजपचं सरकार असतानाही होत आहे.
- यंत्रणा काय तुमच्या हातातील बाहुली आहे का?
- ही काही तुमच्या हातातली बाहुली नाही जिचा वापर तुम्हाला नको असलेला माणूस संपवण्यासाठी करायचा.
- ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
- अशाप्रकारे करुन चालणार नाही.
- ज्यांनी गुन्हे केलेत ते मोकाट सुटले आहेत.
सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही-
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर समाधानी आहात का? यावर ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे सरकारचा कारभार पाहता आला नाही.
- त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करावं? असा सवाल त्यांनी केला.
सध्या माझं इंजिन मीच चालवतोय!
- होय, मनपा निवडणुकांची तयारी सुरू.
- यावेळी राज यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट केलं.
- आगामी निवडणुकांमध्ये मनसेचे वातावरण चांगलंच असेल.
- सध्या माझं इंजिन मीच चालवतोय.
- निवडणुकांमध्ये परिस्थितीनुसार एकला चलो रे अशी भूमिका राहील, असं राज ठाकरे म्हणाले.