मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे अखेर स्थगित झाला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राज ठाकरे यांनी हा दौरा रद्द केल्याची टीका त्यांच्या राजकीय विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेनं सहकार्य केलं असतं!!
- आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत.
- इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते.
- त्यांनी ते रद्द केले.
- पण ५ जूनच्या कार्यक्रमासाठी त्यांना काही सहकार्य हवं असतं, तर ते आम्ही नक्कीच दिलं असतं.
- अयोध्या, उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे.
भाजपाच्या हातात वापरले जातोय हे काहींना उशीरा समजतं…
- भाजपाने त्यांच्या बाबतीत असं का करावं.
- हे चुकीचं आहे.
- प्रत्येक वेळी भाजपा असा खेळ करतं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेतं.
- त्यातलाच हा प्रकार मला दिसतोय.
- यातून एक शहाणपण काही लोकांना आलं, तर बरं होईल.
- यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं, महाराष्ट्राचं होतं.
- आपण भाजपाच्या हातात वापरले जातोय हे काही लोकांना उशीरा समजतं.
- आम्ही हा विषय मर्यादित ठेवलाय.
- हे राजकारण आम्हाला करायचं नाही.
- काहींना तीर्थयात्रेला जायचं असतं, तेव्हा ते विचारतात काही मदत करू शकता का?
- शिवसेनेचं एक मदत कक्ष आहे.
- कुणाला दर्शनाला अडचणी येत असतील, तर आम्ही मदत करतो.
- तिथे आम्ही राजकारण बाजूला ठेवतो.