मुक्तपीठ टीम
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांना नेहमी काश्मीरच्या सुंदर निसर्गात दोन क्षण मजेत घालवायचे आहेत, पण रोजच्या धकाधकीत ते जमलेलं नाही, अशांसाठी ही चांगली बातमी आहे. आता भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीने काश्मीर पर्यटनाचं खास पॅकेज जाहीर केलंय. मुंबई ते श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम पर्यंत पाच रात्री आणि सहा दिवसांचे विशेष टूर पॅकेज आहे. सर्वप्रथम, प्रवाशांना इंडिगो विमानाने मुंबईहून श्रीनगरला नेले जाईल. टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत २७ हजार ३०० रुपये ठेवण्यात आली आहे.
मुंबईहून हा दौरा २५ किंवा २६ सप्टेंबर रोजी सुरू होईल. हा दौरा इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टूरिझम कॉर्पोरेशनने आयोजित केला आहे. सर्वप्रथम, प्रवाशांना इंडिगो विमानाने मुंबईहून श्रीनगरला नेले जाईल. हवाई तिकिटे, हॉटेलची राहण्याची सोय, नाश्ता आणि रात्रीचे जेवण, प्रवास, प्रवासादरम्यान आयआरसीटीसी टूर एस्कॉर्ट सेवा, प्रवास विमा, टोल पार्किंग आणि कर हा सर्व विशेष पॅकेजचा भाग आहे. तसेच, पर्यटन केंद्रांवर दुपारचे जेवण आणि प्रवेश तिकिटांसाठी पैसे द्यावे लागतील.
मुंबई ते काश्मीरपर्यंतचा प्रवास
- मुंबईहून ते श्रीनगरला पोहचल्यानंतर हाऊसबोटवर चेक-इन करू शकता. दुपारी तलावाकडे तसेच सुंदर टेकड्यांवर फिरता येईल.
- आपल्या खर्चाने शिकारा राइडचा आनंदही घेता येईल.
- श्रीनगरमध्ये रात्रभर मुक्कामाची सोय आहे. तिथे रात्रीच्या जेवणाची सोयही आहे.
- दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर, पहलगामच्या दिशेने प्रवास सुरू होईल. तेथे बेताब व्हॅली, अवंतीपुरा अवशेष, चंदनवाडी आणि अरु व्हॅलीची सुंदर ठिकाणे आहेत.
- पहलगामला पोहोचल्यानंतर स्वखर्चाने टट्टू राईड किंवा स्थानिक वाहन भाड्याने घ्यावे लागेल.
- तिसऱ्या दिवशी बर्फाच्छादित गुलमर्ग दऱ्यातून प्रवास सुरू होईल.
- दिवसभराच्या प्रेक्षणीय स्थळांच्या दर्शनानंतर, श्रीनगरला परत नेले जाईल. रात्रीच्या जेवणाची सोयही तिथेच केली जाईल.
- चौथ्या दिवशी सोनमर्गला जाण्यासाठी प्रवास सुरू होईल. येथील पर्यटन स्थळे फिरून झाल्यानंतर, श्रीनगरला पुन्हा नेले जाईल.
- शेवटच्या पाचव्या दिवशी श्रीनगरच्या लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी नेण्लयात येईल. ज्यात मुगल गार्डन, निशांत बाग, शालीमार गार्डन, हजरतबाल आणि बरेच काही समाविष्ट आहे. संध्याकाळी तुम्ही खरेदीसाठी देखील जाऊ शकता.
- सहाव्या दिवशी मुंबईला परतण्यासाठी फ्लाइट संध्याकाळी ५:३० वाजता असेल. या फ्लाइटद्वारे तुम्ही थेट मुंबईला परत येऊ शकाल.
या योजनेमुळे आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार काश्मीरला भेट देण्याची योजना आखू शकता.
पाहा व्हिडीओ: