मुक्तपीठ टीम
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे त्यांच्या सौम्य वागण्यासाठी ओळखले जातात. पण जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा ते मेणासारखे मऊ नाही तर वज्रासारखे कठीण होतात, असा अनुभव रेल्वे खात्यातील नोकरशाहीला नुकताच आला. त्यांनी वंदे भारत योजनेच्या आढाव्यासाठी बोलवलेल्या बैठकीला तयारीशिवाय आलेल्या दोन अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलाच दणका दिला. रेल्वे मंत्र्यांनी एका अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर, तर दुसऱ्याला व्हीआरएससाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ महिन्यांमध्ये ७५ वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. स्वाभाविकच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
- तरीही दोन अधिकारी तयारी न करताच रेल्वेमंत्र्यांच्या बैठकीला यावे लागले.
- वंदे भारत एक्स्प्रेसच्या आढावा बैठकीदरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत रेल्वेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारले. वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मितीबाबत रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती.
- या प्रकल्पात कोणतीही हलगर्जी खपवून न घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
अश्विनी वैष्णव यांनी फटकारले
- रेल्वेमंत्र्यांनी आढावा बैठकीत वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मितीशी संबंधित माहिती मागितली.
- दोन अधिकारी योग्य माहिती देऊ शकले नाहीत.
- वंदे भारत सारख्या प्रकल्पाच्या निर्मितीत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याला रेल्वेमंत्र्यांनी फटकारले.
- एमटीआरएस राहुल जैन यांना रजेवर पाठवण्यात आले आणि मंत्रालयातील एका ईडी संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला व्हीआरएस घेण्यास सांगण्यात आले.
- त्यातून रेल्वेला तुमची गरज नाही, असेच सुनावल्याचे मानले जाते.
- त्यातून आता रेल्वे अधिकारी सावध झाले आहेत.
- कारवाईची आफत टाळण्यासाठी आता काम केलेच पाहिजे, असे त्यांच्या लक्षात आल्याचे मानले जाते.
७५ महिन्यांत ७५ वंदे भारत एक्सप्रेस!
- ७५ महिन्यांत ७५ वंदे भारत एक्सप्रेस तयार करण्याची मोठी जबाबदारी रेल्वे मंत्रालयावर आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ७५ महिन्यांत ७५ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या देशाला समर्पित केल्या जातील, असे जाहीर केले आहे.
- रेल्वे मंत्रालय अत्यंत गंभीर असून, रेल्वेमंत्री त्यांच्या निर्मितीचा आढावा घेत आहेत.