Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी मुंबई मेट्रो प्रकल्प अगदी शेवटच्या टप्प्यात, रोलिंग स्टॉकला रेल्वे बोर्डाची मंजुरी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
cidco

मुक्तपीठ टीम

सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रोच्या रोलिंग स्टॉकला रेल्वे बोर्डाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. रोलिंग स्टॉक म्हणजे मेट्रोचे डबे, इलेक्ट्रिकल साधनं इत्यादींचा समावेश असलेल्या वस्तू. नवी मुंबई मेट्रो कार्यान्वित करण्याचा दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. ह मेट्रो प्रवाशांच्या सेवेत कार्यरत होण्यासाठी आता केवळ स्थापत्य कामांसाठीचे पर्यवेक्षण बाकी आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नवी मुंबई मेट्रोचे स्थापत्य कामांसाठीचे पर्यवेक्षण पूर्ण झाल्यावर, नवी मुंबई मेट्रो, फेज १, लाईन १ कार्यान्वयन करण्यासाठी तयार होईल. आता नवी मुंबई मेट्रो प्रकल्प सुरू होण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे.”

नवी मुंबईच्या नव्या विकासाची वाहिनी – मेट्रो सेवा!

  • सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मेट्रो प्रकल्पांचे काम सुरु आहे.
  • नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहेत.
  • त्यांपैकी मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर हा एकूण ११ कि.मी. लांबीचा आहे.
  • या पहिल्या मार्गावर ११ स्थानके आहेत.
  • या मार्गाचा तळोजा येथे आगार म्हणजे डेपो आहे.

 

मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मार्गाच्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी सिडकोकतर्फे महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या आतापर्यंत ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, इमर्जन्सी ब्रेक इ. महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरीत्या पार पडून त्या संदर्भातील प्रमाणपत्रही आरडीएसओकडून प्राप्त झाले आहे.

 

सीएमआरएस यांच्याकडून घेण्यात येणारी सुरक्षाविषयक चाचणी व त्यानंतर प्रदान करण्यात येणारे प्रमाणपत्र हे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून व मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सीएमआरएस यांच्या पथकाकडून १७ आणि १८ जानेवारी रोजी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक व संबंधित अधिकारी तसेच महा मेट्रोचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मार्ग क्र.१ वर आणि तळोजा आगार येथे मेट्रोची सुरक्षाविषयक चाचणी घेण्यात आली होती.

 

स्थापत्य कामांसाठीचे पर्यवेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, सीएमआरएस आणि रेल्वे मंडळ यांच्याकडून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: CIDCOgood newsmuktpeethnavi mumbaiNavi Mumbai Metro ProjectRailway BoardRolling Stockचांगली बातमीनवी मुंबईनवी मुंबई मेट्रो प्रकल्पमुक्तपीठरेल्वे बोर्डरेल्वे मंडळरोलिंग स्टॉकसिडको
Previous Post

महाराष्ट्रातही ताग लागवडीचा प्रयोग, ओडिशामधील शेतकऱ्याच्या सहकार्याने प्रयत्न

Next Post

लवकरच अवघ्या दहा हजारातील जियो बुक लॅपटॉप, अँड्रॉइड ओएसवर चालणार!

Next Post
jio Book Laptop

लवकरच अवघ्या दहा हजारातील जियो बुक लॅपटॉप, अँड्रॉइड ओएसवर चालणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!