Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात ६ हजार घरांचे नुकसान

४ व्यक्तींचा मृत्यू तर महावितरणचे मोठे नुकसान

May 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
tauktae

मुक्तपीठ टीम

 

“तौक्ते” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील आणि तालुक्यांवर पडला असून जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. या नुकसानीत अंदाजे किती रुपयांचे नुकसान झाले आहे, याबाबत माहिती घेण्याची कार्यवाही अद्याप सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर या तालुक्यांना चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका बसला आहे.

 

जिल्ह्यातील ६ हजार २६ घरांचे अंशत: नुकसान तर १० घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एकूण ४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ७ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. कोणतीही व्यक्ती हरविल्याची नोंद नाही. त्याचबरोबर २ प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.

 

महावितरणच्या एकूण १६८ एचटी पोलचे, ४२६ एलटी पोलचे तर १२ ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ६६१ गावातील (लोकसंख्या अंदाजे १ लक्ष ६ हजार) वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.

 

चक्रीवादळामुळे विविध ठिकाणी झाडे/झाडाच्या फांद्या पडल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे बंद झालेले रस्ते मोकळे करण्याची कार्यवाही प्रशासनाने तात्काळ केल्यामुळे सद्य:स्थितीत कोणतेही रस्ते बंद नाहीत. जिल्ह्यातील मच्छीमारांच्या १२५ जाळ्यांचे व १५० बोटींचे अंशतः नुकसान झाले आहे.

 

जिल्ह्यात अंदाजे ५ हजार हेक्टर. आर शेतजमिनीचे नुकसान झाले असून यामध्ये प्रामुख्याने आंबा, नारळ, भातशेती यांचा समावेश आहे. मात्र निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे यावेळी झाडांचे नुकसान न होता फक्त फळांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

 


Tags: tauktae cycloneनिसर्ग चक्रीवादळमहावितरणरायगड जिल्हा
Previous Post

सोमवारपेक्षा नवे रुग्ण वाढले, ५२ हजार रुग्ण बरे होऊन घरी, मुंबईतील नवी रुग्णसंख्या हजाराखाली!

Next Post

ऐतिहासिक जलस्त्रोत संवर्धनासाठी तरुणांची महाराष्ट्र बारव मोहीम

Next Post
Barav Mohim

ऐतिहासिक जलस्त्रोत संवर्धनासाठी तरुणांची महाराष्ट्र बारव मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!