मुक्तपीठ टीम
नॅशनल हेराल्ड प्रकरणी येत्या १३ जूनला काँग्रेस नेते राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार आहेत. यासाठी काँग्रेसनेही खास तयारी केली आहे. काँग्रेसच्या सर्व खासदारांना राहुल गांधींच्या हजेरीच्या दिवशी सकाळी पक्षाच्या मुख्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे. म्हणजेच ईडीच्या समन्सविरोधात काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार आहे. एकप्रकारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी ईडीला सामोरे जाताना शरद पवारांचा ईडीशी सामन्याचा मार्ग वापरत असल्याची चर्चा आहे.
काँग्रेस सोमवारी आपल्या मुख्यालयापासून एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडी मुख्यालयापर्यंत रॅली काढणार आहे.त्याद्वारे आपली राजकीय ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.काँग्रेसने या रॅलीच्या तयारीसाठी गुरुवारी संध्याकाळी आपले सरचिटणीस, राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची ऑनलाइन बैठक बोलावली आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरील मनी लाँड्रिंग प्रकरणाला काँग्रेसने भाजपाचा राजकीय सूड असल्याचे म्हटले आहे.
१३ जूनला राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार!
- गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस १३ जून रोजी धरणे आंदोलन करण्यास सांगण्यात आले आहे.
- ईडीने २ जून रोजी राहुल गांधी आणि ८ जून रोजी सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते.
- मात्र परदेशात असल्याने राहुल यांनी नंतरची वेळ मागितली होती, त्यानंतर त्यांना १३ जूनला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
- कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी बुधवारी ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत.
- या दोन नेत्यांचे जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत नोंदवले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शरद पवारांनी काय केलं होतं?
वाचा खालील बातमी:
शरद पवार: ईडीलाच दिलं होतं आव्हान, ईडीपिडेतूनही राजकीय फायदा!