Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल, कोरोनाच्या निमित्ताने भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pm Modi And Rahul Gandhi

मुक्तपीठ टीम

चीनसह काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून आवाहन केले होते की, कोरोनाचे नियम पाळता आले नाहीत तर ‘भारत जोडो यात्रा’स्थगित करण्याचा विचार करावा. राहुल गांधी यांनी जाहीर सभेत यावर भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोलेही लगावले. ते म्हणाले की, विरोधक समोर उभे ठाकले की मोदी मैदान सोडतात. आताही कोरोनाच्या निमित्ताने भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून ही यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे.

कोरोनाच्या निमित्ताने भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न!

  • ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थान टप्प्यानंतर बुधवारी नूह येथून हरियाणात दाखल झाली होती.
  • हरियाणातील नुह जिल्ह्यातील घासेडा गावात राहूल गाँधी यांनी एका सभेला संबोधित करताना त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली.
  • ते म्हणाले “ही यात्रा काश्मीरपर्यंत जाईल.
  • आता विरोधकांनी नवीन पद्धत आणली आहे.
  • त्यांनी मला पत्र लिहिले की कोरोना पसरत आहे, यात्रा थांबवा.
  • आता ते यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • मास्क घाला, यात्रा थांबवा, कोरोना पसरत आहे, हे सगळे बहाणे आहेत.
  • मंगळवारी मांडविया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून सांगितले की, कोरोना प्रोटोकॉलचे पालन करता येत नसेल तर यात्रा पुढे ढकलण्याचा विचार करा.
  • भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत राहूल गांधी म्हणाले की, त्यांना सत्याची भीती वाटते, हे लोक भारताच्या शक्तीला आणि सत्याला भाजपा घाबरला आहेत आणि हेच सत्य आहे.

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल!

  • आम्हाला आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेषाने भरलेला भारत नको आहे.
  • ते देशात भीती आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • मोदींचे चारित्र्य समजून घ्या, जेव्हा कोणीही त्यांच्या विरोधात उभे राहतात, मग ते शेतकरी असो ज्यांनी रद्द केलेल्या तीन शेती कायद्यांना विरोध केला होता, ते विरुद्ध दिशेने चालू लागलेत.
  • जेव्हा कोणी त्यांच्या विरोधात उभे राहते तेव्हा मोदी त्यांना तोंड देत नाहीत, ते पळून जातात आणि मैदान सोडतात.
  • भाजपा सरकार संसदेतील काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच ही यात्रा काढण्यात आली आहे.
  • असे आरोप राहूल गांधींनी मोदींना लगावले.

Tags: Bharat Jodo YatraCorona VirusIndiapm modirahul gandhiपंतप्रधान मोदीभारत जोडो यात्राराहूल गाँधी
Previous Post

वाढवण बंदराचा विकास करताना स्थानिकांचे सर्व प्रश्न चर्चेतून सोडविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

कोरोनाचा नवा Omicron BF.7 व्हायरस प्रतिकारशक्तीला गुंगारा देण्याबरोबरच संसर्गातही वेगवान!

Next Post
corona

कोरोनाचा नवा Omicron BF.7 व्हायरस प्रतिकारशक्तीला गुंगारा देण्याबरोबरच संसर्गातही वेगवान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!