मुक्तपीठ टीम
चीनसह काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून आवाहन केले होते की, कोरोनाचे नियम पाळता आले नाहीत तर ‘भारत जोडो यात्रा’स्थगित करण्याचा विचार करावा. राहुल गांधी यांनी जाहीर सभेत यावर भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोलेही लगावले. ते म्हणाले की, विरोधक समोर उभे ठाकले की मोदी मैदान सोडतात. आताही कोरोनाच्या निमित्ताने भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून ही यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे.
कोरोनाच्या निमित्ताने भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न!
- ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थान टप्प्यानंतर बुधवारी नूह येथून हरियाणात दाखल झाली होती.
- हरियाणातील नुह जिल्ह्यातील घासेडा गावात राहूल गाँधी यांनी एका सभेला संबोधित करताना त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली.
- ते म्हणाले “ही यात्रा काश्मीरपर्यंत जाईल.
- आता विरोधकांनी नवीन पद्धत आणली आहे.
- त्यांनी मला पत्र लिहिले की कोरोना पसरत आहे, यात्रा थांबवा.
- आता ते यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
- मास्क घाला, यात्रा थांबवा, कोरोना पसरत आहे, हे सगळे बहाणे आहेत.
- मंगळवारी मांडविया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून सांगितले की, कोरोना प्रोटोकॉलचे पालन करता येत नसेल तर यात्रा पुढे ढकलण्याचा विचार करा.
- भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत राहूल गांधी म्हणाले की, त्यांना सत्याची भीती वाटते, हे लोक भारताच्या शक्तीला आणि सत्याला भाजपा घाबरला आहेत आणि हेच सत्य आहे.
राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल!
- आम्हाला आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेषाने भरलेला भारत नको आहे.
- ते देशात भीती आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
- मोदींचे चारित्र्य समजून घ्या, जेव्हा कोणीही त्यांच्या विरोधात उभे राहतात, मग ते शेतकरी असो ज्यांनी रद्द केलेल्या तीन शेती कायद्यांना विरोध केला होता, ते विरुद्ध दिशेने चालू लागलेत.
- जेव्हा कोणी त्यांच्या विरोधात उभे राहते तेव्हा मोदी त्यांना तोंड देत नाहीत, ते पळून जातात आणि मैदान सोडतात.
- भाजपा सरकार संसदेतील काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच ही यात्रा काढण्यात आली आहे.
- असे आरोप राहूल गांधींनी मोदींना लगावले.