Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत जोडो यात्रा: राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष…आणि महाराष्ट्राच्या समस्या ऐकण्याचं मिशन!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rahul gandhi first speech of bharat jodo yatra in maharashtra

मुक्तपीठ टीम

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाली. हाती मशाल घेत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला. यावेळी राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींचे मनापासून स्वागत केले. नांदेडमध्ये येताच राहुल गांधी यांनी देगलूर येथे जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्या भाषणाची सुरुवात राहुल गांधी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देऊन केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

ही यात्रा श्रीनगरला जाऊनच थांबेल, राहुल गांधी

  • रात्रीच्या पावणेदहा वाजता या स्वागतासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.
  • तेलंगणाहून आमच्यासोबत जी लोक आली आहेत आणि जी गर्दी आहे, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो.
  • ही यात्रा दोन महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारीहून सुरू केली होती आणि ही यात्रा श्रीनगर येथे जाऊन थांबणार आहे.
  • या अगोदर या पदयात्रेस कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही.
  • काहीजरी झालं तरी ही यात्रा श्रीनगरमध्ये जसा इथे आपला तिरंगा ध्वज आहे, तिथेही तिरंगा ध्वज फडकवेल.
  • या यात्रेचे उद्दिष्ट भारताला जोडण्याचे आहे आणि आज ज्याप्रकारे भारतामध्ये द्वेष, क्रोध आणि हिंसा पसरवली जात आहे, त्याविरोधात आवाज उठवण्याचे आहे.
  • या पदयात्रेत जे पण आमच्याशी बोलू इच्छित आहेत, मग तो शेतकरी, मजूर, लहान व्यापारी, तरूण, वयस्कर व्यक्ती, व्यापारी किंवा कोणीही आमचे दरवाजे, आमचे हृदय त्यांच्यासाठी खुलं आहे.
  • आमचं ध्येय भारत आणि आता पुढील पंधरा दिवस महाराष्ट्राचा आवाज, महाराष्ट्राचं सुख-दुःख ऐकायचं आहे. आमचं हेच उद्दिष्ट आहे.

केंद्र सरकार निवडक लोकांना संपूर्ण फायदा पोहचवतेय…

  • तुम्हाला माहीत आहे देशात बेरोजगारी वाढत आहे.
  • जो रोजगाराचा कणा होता, छोटे आणि मध्यम व्यवसाय, लहान व्यापारी, शेतकरी हा कणा नरेंद्र मोदींच्या धोरणाने, नोटाबंदीने, चुकीच्या जीएसटीने तोडला आहे.
  • आज भारताचे सत्य आहे, की देश आपल्या तरुणांना रोजगार देऊ शकत नाही.
  • इच्छा असली तरी रोजगार देऊ शकत नाही.
  • एकीकडे बेरोजगारी, तर दुसऱ्या बाजूला महागाई आहे.
  • तुम्हाला आठत असेल भारताचे पंतप्रधान काही काळ अगोदर तक्रार करत होते, गॅस सिलिंडर ४०० रुपयांचा झाला.
  • आज त्याची किंमती किती झाली आहे?
  • आजच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत पंतप्रधान काहीच बोलत नाहीत.
  • अगोदर पंतप्रधान डिझेल-पेट्रोलबाबत बोलत होते, आज १०० रुपयांच्या पुढे पेट्रोलचे दर आहेत.
  • मात्र पंतप्रधान काहीच म्हणत नाहीत.
  • केवळ निवडक लोकांना, दोघा-तिघांना संपूर्ण फायदा सरकार पोहचवत आहे.
  • या मुद्य्यांसाठी आम्ही उभा आहोत, आम्ही चालतो आहोत दिवसभर चालतो आहोत आणि तुमचं म्हणणं ऐकत आहोत.
  • सहा-सात तास ऐकल्यानंतर जे शेतकऱ्यांच्या मनात आहे, मजुरांच्या मनात आहे ते ऐकल्यानंतर यात्रेच्या शेवटी सांयकाळी आम्ही १५ मिनिटे, जास्तीत जास्त २० मिनिटे आमचं म्हणणं मांडतो.
  • हेच आम्ही महाराष्ट्रात करणार आहोत.
  • मला खूप आनंद होत आहे की आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्यासमोर उभा राहून ही सुरुवात करत आहे.
  • हा तुमचा इतिहास आहे आणि खूप आवश्यक प्रतिक आहे.
  • मला खूप आनंद होत आहे की आज इथून आम्ही आज सुरुवात करत आहोत.
  • रात्रीची वेळ असल्याने मी फार काही बोलणार नाही.
  • मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद म्हणू इच्छितो.

Tags: Bharat Jodo YatraCongressMaharashtranandedrahul gandhiकाँग्रेसछत्रपती शिवाजी महाराजनांदेडभारत जोडो यात्रामहाराष्ट्रराहुल गांधी
Previous Post

नाशिकमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय विभागात २२६ जागांसाठी करिअर संधी

Next Post

कोल्हापूरमध्ये विशाल हिंदुत्वाची मशाल मिरवणुकीचे आयोजन

Next Post
Kolhapur Mashaal Yatra

कोल्हापूरमध्ये विशाल हिंदुत्वाची मशाल मिरवणुकीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!