Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राचे उद्योग राज्याबाहेर नेऊन मोदींनी तरुणांचे रोजगार, नोकऱ्या हिरावल्या – राहुल गांधी

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rahul Gandhi on pm modi

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले, एअरबसचा प्रकल्पही असाच गुजरातमध्ये अचानक गेला. कसा गेला? हे कोणालाही कळले नाही. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयांची गुंतवणुकही गेली व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर एमआयडीसी येथील आजच्या दिवसातील भारत जोडो पदयात्रेच्या संध्याकाळच्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, रजनी पाटील, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी उपस्थित होते.

राहुलजी गांधी पुढे म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी ही पदयात्रा सुरू केली आणि आज महाराष्ट्रात आली आहे. उन्हा-तान्हात तुम्ही मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दिवसभर ७-८ तास दररोज चालतो. शेतकरी, तरुण, महिला, यांच्या समस्या ऐकून घेतो. मला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. रस्त्यावरून चालणे व गाडीतून चालणे यात फरक आहे. हिंदुस्थान समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावर चालले पाहिजे. रस्ते कसे आहेत ते आधी कळते, राज्याची अवस्था रस्त्यावरून कळते.

शेतकरी, तरुण, यांच्याकडून ऐकतो तेव्हा वाईट वाटते. ६ वर्षापूर्वी नोटबंदी केली त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. नोटाबंदी व जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्सुनामी आली. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली.

सरकारी उद्योग खाजगी उद्योगपतींना विकले जात आहेत. सरकारी नोक-या नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. पट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅस महाग झाले. एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. जनतेचा आवाज मोदी सरकार ऐकत नाहीत. संसदेत बोलण्यास सुरू केले की लगेच माईक बंद केला जातो. देशातील तरुण लष्करात भरती होऊन देशसेवा करू पहात आहे पण नरेंद्र मोदींनी त्यावर पाणी फेरले आहे फक्त चार वर्षेच सेवा करा आणि घरी बसा अशी व्यवस्था करून ठेवली आहे.

कोणालाही घाबरू नका, मनातील भिती काढून टाका. जो ही भिती घालवेल तो द्वेष पसरवू शकत नाही म्हणून मनातून भिती काढून टाका असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. मुलगा व मुलगी यांच्यात भेदभाव करू नका, मुलींना समान वागणूक दिली पाहिजे. जो समाज, देश मुलींचा सन्मान कलत पाहो तो देश प्रगती करू शकत नाही त्यासाठी मुलागा मुलगी भेदभाव न करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले.


Tags: employmentMaharashtrapm modirahul gandhiमहाराष्ट्रराहुल गांधी
Previous Post

बच्चू कडूंचं स्वप्न साकारणार, राज्यात लवकरच स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग!

Next Post

आरक्षणासाठी दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चनांना अनुसुचित वर्गाचा दर्जा नाही: केंद्र सरकार

Next Post
Supreme Court

आरक्षणासाठी दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चनांना अनुसुचित वर्गाचा दर्जा नाही: केंद्र सरकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!