मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेवर निशाणा साधला आहे. डॉलरचा शस्त्रासारखा वापर करून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बदनाम केले आहे, असा आरोप पुतिन यांनी केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या सर्वात धोकादायक दशकाचा आपण सामना करत आहोत, असे पुतीन यांनी म्हटले आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले की, आम्ही अमेरिकेसोबत राजकीय स्थैर्यासाठी पुन्हा चर्चा सुरू करण्यास तयार आहोत. दरम्यान, अमेरिकेवर आरोप करताना ते म्हणाले की, आम्हाला अमेरिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही.
युक्रेनवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांवरही हल्ले करत आहेत. पुतिन यांनी युक्रेनमधील संघर्षाला प्रोत्साहन देऊन पाश्चात्य देश जागतिक वर्चस्व मिळवत असल्याचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय धोरण तज्ञांच्या परिषदेत, पुतिन यांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर युक्रेनविरोधात “धोकादायक आणि रक्तरंजित” वर्चस्वच्या खेळात इतर देशांना त्यांच्या अटी सांगण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
पुतिन यांनी दिला इशारा :
- रशिया गेल्या ८ महिन्यांपासून युक्रेनवर हल्ला करत आहे.
- दरम्यान, या संघर्षाला जो कोणी प्रोत्साहन देईल तो संकटाला आमंत्रण देईल, असा इशारा रशियाने पुन्हा एकदा दिला आहे.
- पुतिन म्हणाले की, मानवजातीला निवडायचे आहे की समस्यांचे ओझे वाढवत राहायचे की जो आपल्या सर्वांना चिरडून टाकेल किंवा असे उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे जे आदर्श नसतील परंतु तरीही ते कार्य करेल आणि जगाला अधिक स्थिर आणि सुरक्षित बनवू.