Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीए फर्मनं ध्वज संकलनातून जपला तिरंग्याचा अभिमान

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Flag Collection Campaign

मुक्तपीठ टीम

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील स्वातंत्र्यदिन अधिकच उत्साहात साजरा झाला. त्यासाठी आयोजित विविध उपक्रम आणि घरोघरी तिरंगा डौलानं फडकवण्यातही नागरिकांचा उत्साह दिसला. मात्र, त्यानंतर नेहमीप्रमाणेच घडले. उत्सव संपला आणि डौलानं मिरवलेले तिरंगे झेंडे अनेक ठिकाणी तसेच पडले. तिरंगा अभियानातून स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी रस्त्यावर इतरत्र पडलेले ध्वज संकलित करत पुण्यातील कीर्तने अँड पंडित एलएलपी सीए फर्मने तिरंग्याचा अभिमान जपला. त्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.
Flag Collection Campaign
कर्वे रस्त्यावरील कीर्तने अँड पंडित एलएलपी सीए फर्मतर्फे मंगळवारी (ता. १६) सकाळी कर्वे रस्ता, पौड रस्ता, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता यासह शहराच्या विविध भागात हे ध्वज संकलन अभियान राबवले. ‘कीर्तने अँड पंडित’चे पार्टनर सीए मिलिंद लिमये यांच्या नेतृत्वात जवळपास १०० लोकानी यात सहभाग घेतला. यामध्ये सीए, आर्टिकलशिप करणारे विद्यार्थी सहभागी झाले होते.
Flag Collection Campaign
‘आयसीएआय’च्या विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, ‘विकासा’च्या चेअरमन मौसमी शहा, सीए शशांक पत्की, ‘कीर्तने अँड पंडित’चे पार्टनर श्रीपाद कुलकर्णी, प्रल्हाद मानधना, तन्मय बोधे व आनंद जोग आदी उपस्थित होते.
Flag Collection Campaign
सीए मिलिंद लिमये म्हणाले, “प्रत्येक भारतीयांचा अभिमान असलेल्या तिरंगा ध्वजाचा अवमान होऊ नये, त्याचा उचित सन्मान व्हावा, या हेतूने ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ हे विशेष ध्वज संकलन अभियान राबविले. ‘कीर्तने अँड पंडित’मधील माझ्या सहकाऱ्यांनी शहराच्या विविध भागात फिरून ध्वज संकलित केले. हे सर्व ध्वज सन्मानपूर्वक भारत फ्लॅग फाउंडेशनकडे सुपूर्त केले जाणार आहेत. व्यावसायिकतेसह सामाजिक भान जपणारी आमची सीए फर्म आहे.”
Flag Collection Campaign

पाहा:

 


Tags: CA FIRMFlag Collection CampaignGood news MorningKirtane And Pandit LLP CA Firmकीर्तने अँड पंडित एलएलपी सीए फर्मगुड न्यूज मॉर्निंगध्वज संकलन अभियानसीए फर्म
Previous Post

पुण्यात गप्पा रंगवण्यासाठी आणखी एक कट्टा…नॉलेज कट्टा!

Next Post

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर या पदांवर संधी

Next Post
Life Insurance Corporation of India

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर या पदांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!