Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँक खात्यांमधून अब्जावधीच्या ई-घोटाळ्याचा कट! भाजपाच्या ‘या’ पदाधिकाऱ्यासह आयटी टोळी जेरबंद!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
बँक खात्यांमधून अब्जावधीच्या ई-घोटाळ्याचा कट! भाजपाच्या ‘या’ पदाधिकाऱ्यासह आयटी टोळी जेरबंद!!

मुक्तपीठ टीम

कोरोना काळात आलेल्या मंदीवर मात करून खिशात तेजी आणण्यासाठी दुसऱ्यांच्या बँक खात्यातील अब्जावधी ढापण्याचा कट एका हाय-टेक टोळीनं रचला होता. तो कट रचण्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी आयटी अभियंत्यांच्या एका टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीत भाजपाचा पुण्यातील एक पदाधिकारीही पकडला गेल्याने खळबळ माजली आहे. या खात्यांमध्ये २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपये एवढी रक्कम आहे. पुणे पोलिसांच्या सायबर क्राइम पथकाने माहिती मिळाल्यानंतर रात्रभर कारवाई करून टोळीला जेरंबद करून गोपनीय माहिती विकण्यासाठी घेतलेली २५ लाख रुपयांची आगाऊ रक्कमही जप्त केली आहे.

 

आयटी टोळीचा ई-घोटाळ्याचा कट होता तरी कसा?

 

  • बँकांमध्ये अनेक खाती वापरात नसतात, अशा वापरात नसलेल्या काही खात्यांमध्ये मोठ्या रकमा असतात.
  • बँकांमधील आयटी विभागात कार्यरत अभियंत्यांनाही त्याची माहिती असते.
  • डॉरमेंट अकाऊंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा खात्यांची माहिती चार आयटी अभियंते चोरत असत.
  • खरंतर बँक खातेधारकांचे खात्यातील जमा रक्कम, पिन क्रमांक आणि इतर गोपनीय माहिती दुसऱ्यांना माहिती असू नये. ती गोपनीय असावी.
  • पण हे अभियंते बँकांमधील वापरात नसलेल्या खात्यांची ती गोपनीय माहिती मिळवत असत.
  • आयटी अभियंते त्यांनी मिळवलेली ही गोपनीय माहिती भाजपाच्या चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष रोहन मंकणी यांना देत असत.
  • चार आयटी अभियंत्यांनी चोरलेली माहिती उर्वरित पाचजणांना पुरवली जात असे.
  • त्या पाचजणांमध्ये दोन सॉफ्टवेयर अभियंते आणि तीन स्टॉक ब्रोकर/ व्यापारी खरेदीदार आहेत
  • आरोपी रोहन मंकणी बँक खात्यांच्या गोपनीय माहितीची विक्री करून त्याबदल्यात  मोठी रक्कम मिळवणार होते.
  • या खात्यांमध्ये २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपये एवढी रक्कम होती.
  • इतर आरोपी त्या गोपनीय माहितीचा वापर करून वापरात नसलेल्या बँक खात्यांमधील मोठ्या रकमा दुसऱ्या खात्यांमध्ये वळवून हडपणार होते.
  • हा एक प्रकारचा बँक खात्यांमधील ई-घोटाळाच!

 

त्याबद्दलची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्वरित हालचाली झाल्या. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील सुधीर भटेवरा यांच्याकडून पैसे घेण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले. आरोपींकडून बँक खात्यांची गोपनीय माहिती विकण्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून मिळालेली पंचवीस लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

 

त्यानंतर गुजरातमधील आणखी दोन संशयित मुंबईतील रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  त्यानंतर पोलिसांची टीम मुंबईत गेली आणि त्यांना अटक केली. रात्रभर चाललेल्या कारवाईत पोलिसांनी २५ लाख रुपये, दोन दुचाकी, एक स्कूटर आणि ११ सेलफोन जप्त केले.

 

पोलिस उपायुक्त (सायबर) भाग्यश्री नवाटके यांनी सांगितले की, “यापैकी बरीच खाती गेल्या काही वर्षांपासून वापरात नव्हती. अटक केलेले संशयित आरोपी हैदराबाद, औरंगाबाद, सूरत, पुणे आणि इतर ठिकाणाहून आले आहेत.”

 

“एखादा मोठा सायबर क्राईम होण्यापूर्वी पोलिसांकडून ही मोठी प्रतिबंधात्मक कारवाई आहे. खासगी बँकांच्या अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेबाबत विचारणा करू,” असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

बँक ई-घोटाळा प्रकरणातील अटक आरोपी

 

  • रोहन रवींद्र मंकणी
  • रवींद्र महादेव माशाळकर
  • आत्माराम हरिश्चंद्र कदम
  • मुकेश हरिश्चंद्र मोरे
  • विशाल धनंजय बेंद्रे
  • सुधीर शांतिलाल भटेवरा
  • राजेश मुन्नालाल शर्मा
  • परमजितसिंग संधू
  • अनघा अनिल मोडक

Tags: E-Fraudravindra makaniआयटी टोळीई-घोटाळारोहन रवींद्र मंकणी
Previous Post

उडत्या विमानात झाला बाळाचा जन्म…महिला डॉक्टरमुळे सुखरुप प्रसुती!

Next Post

खासदार अमोल कोल्हेंनी मोदी सरकारला आठवण करुन दिली ‘या’ शिवनीतीची!

Next Post
amol kolhe

खासदार अमोल कोल्हेंनी मोदी सरकारला आठवण करुन दिली 'या' शिवनीतीची!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!