Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईकांवरील ‘कर्मयोद्धा- राम नाईक’ पुस्तकाचे प्रकाशन

January 11, 2022
in घडलं-बिघडलं
0
Publication of the book 'Karmayoddha- Ram Naik' By governer

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची आत्मकथा मांडणाऱ्या चरैवेति! चरैवेति!! या लेखसंग्रहावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘कर्मयोद्धा- राम नाईक‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. राम नाईक यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

Publication of the book 'Karmayoddha- Ram Naik' By governer               

राजभवन येथील बँक्वेट हॉलमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भगत सिंह कोश्यारी बोलत होते. या प्रकाशन सोहळ्याला माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाल शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार मंगलप्रभात लोढा, नवभारत टाइम्सचे संपादक शचिन्द्र त्रिपाठी, पुस्तकाचे प्रकाशक आनंद लिमये, विधिमंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

            

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, ‘कर्मयोद्धा राम नाईक‘ हे पुस्तक प्रेरणादायी आहे. राम नाईक यांनी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळविलेले यश हे देशासाठी मार्गदर्शक‍ आहेत. श्री.नाईक यांनी त्यांचे जीवन जनतेच्या सेवेत समर्पित केले आहे. विशेषत: कुष्ठरोग पिडितांसाठी सातत्याने लढा देवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘कर्मयोद्धा राम नाईक‘ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. याचा आनंद होत आहे. राम नाईक यांनी देशनिर्माण कार्यात दिलेले योगदान नक्कीच वाखाणण्यासारखे आहे. अशाच प्रकारे नव्या पिढीने देखील एकत्रित येवून काम करावे. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे प्रेरणादायी कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावे, अशा शुभेच्छा भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी दिल्या.

            

पुस्तकाविषयी राम नाईक म्हणाले, उत्तरप्रदेश राज्याचे राज्यपाल असताना कर्मयोद्धा हे पुस्तक उत्तरप्रदेशातील अवधनामा या उर्दू वृत्तपत्राचे संपादक वकार रिझवी यांनी लिहिले. कोरोना महामारीमुळे या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये खंड पडला होता. या महामारी दरम्यान रिझवी यांचे निधन झाल्यामुळे या पुस्तक निर्मितीची जबाबदारी घेऊन ते पूर्णत्वास नेले. ‘कर्मयोद्धा‘ पुस्तकाचे मराठी व्यतिरिक्त ११ भाषेत अनुवाद करण्यात आले असून याचे विशेषतः जर्मन, पारशी आणि अरबी या तीन भाषेतही अनुवाद करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ब्रेल लिपीतही हे पुस्तक उपलब्ध आहेत. ‘कर्मयोद्धा‘ या पुस्तकाचे तीन खंड आहेत. यात माजी राज्यपाल राम नाईक यांच्या लेख संदर्भातील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री, खासदार यांच्या भाषणांच्या संग्रहांचा समावेश करण्यात आला आहे. हे पुस्तक नव्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असेही राम नाईक यांनी यावेळी सांगितले.

            

यावेळी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार मंगलप्रभात लोढा, नवभारत टाइम्स संपादक शचिन्द्र त्रिपाठी, प्रकाशक आनंद लिमये यांनी मनोगत व्यक्त केले.


Tags: governor bhagat singh koshyarikarmayoddhaRam naikvinod tawdeकर्मयोद्धाराज्यपाल भगत सिंह कोश्यारीराम नाईक
Previous Post

मेघोली प्रकल्प फुटीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई संदर्भात लवकरच निर्णय

Next Post

भारतीय लोक प्रशासन संस्थेचे कै. बी. जी. देशमुख निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Next Post
IIPA

भारतीय लोक प्रशासन संस्थेचे कै. बी. जी. देशमुख निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!