Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कबड्डीचे १०० महायोद्धे” पुस्तकाचे प्रकाशन, कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान

April 10, 2022
in घडलं-बिघडलं
0
कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा

मुक्तपीठ टीम

कबड्डी खेळात राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी  करणाऱ्या खेळांडूचा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित करणाऱ्या  “कबड्डीचे १०० महायोद्धे” या पुस्तकाचे प्रकाशन आणि कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बिकेसी येथील एम.सी.ए.  क्लब येथे  हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा 4

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यावेळी म्हणाले की, हूतुतू ते कबड्डी हा प्रवास प्रत्यक्ष मातीत खेळून राज्याच्या या लोकप्रिय खेळाचा इतिहास गाजविणारे पुस्तक व कबड्डीचा प्रत्येक योद्धा घडविणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा आहे. कबड्डी महर्षी शंकरराव बुवा साळवी यांच्या सारखे मार्गदर्शक व प्रशिक्षकांनी या खेळास मोठ्या उंचीवर नेण्यास मोलाची कामगिरी  बजावली आहे. अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशा ९९ पुरुष व महिला खेळाडू ज्या एका व्यक्तीने भक्कम आधार देऊन घडविले, त्यांचा हा सन्मान आहे. खेळाडूंना जगभरातील वातावरणात खेळण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशने इनडोअर अकादमीची स्थापन केली, अशा अकादमी सर्व भारतीय खेळांसाठी निर्माण करता येऊ शकतात. राज्य शासन त्या धर्तीवर आघाडीचे कार्य करीत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठाची उभारणी एक उत्तम उदाहरण आहे. कबड्डी महायोद्धा पुरस्कार विजेत्यांनी उत्तम खेळाडू घडविण्यासाठी यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन शरद पवार यांनी  केले.

कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा 2

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार अभिनंदनपर संदेशातून म्हणाले की, मातीतील खेळाचा गौरवशाली इतिहास मांडणारे हे पुस्तक भविष्यात नवे खेळाडू घडविण्याचे कार्य करेल. कबड्डी या खेळाला सातासमुद्रापार नेण्यात पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे,  असे उपमुख्यमंत्री शरद पवार म्हणाले.

कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा 3

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले की, जागतिक दर्जाचे खेळाडू हेच राज्याला व देशाला सर्वच क्षेत्रात निरोगी, सुदृढ  मनुष्यबळ  उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणी हे मनुष्यबळ निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नक्कीच योगदान देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.

कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा 1

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनात राज्य क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती करेल, असे सांगून पुरस्कार विजेते व आयोजकांचे  क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आभार व्यक्त केले.

कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा

खासदार सुनील तटकरे म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षात या खेळासाठी व खेळ सातासमुद्रापार नेण्यात मोलाची कामगिरी  पुरस्कार विजेत्या खेळाडूंची आहे. त्याचप्रमाणे खासदार शरद पवार यांनीही सर्व स्तरांवर सकारात्मक भूमिका आजपर्यंत घेतली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर, मुंबई कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष भाई जगताप, प्रशिक्षक शंकरराव साळवी , अर्जुन पुरस्कार व शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी केले.


Tags: aditi tatkaresharad pawarSUNIL KEDARकबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कारकबड्डीचे १०० महायोद्धेक्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरेक्रीडामंत्री सुनील केदारशरद पवार
Previous Post

सपा नेते अबू आझमींचा मुलगा फरहान आझमी, सून आयेशा टाकियाशी विमानतळावर गैरवर्तन! भेदभावाचा आरोप!!

Next Post

#मुक्तपीठ #Live “कोल्हापूर भाजपाच जिंकणार! फडणवीसांचा निर्धार!!”

Next Post
#मुक्तपीठ #Live   “कोल्हापूर भाजपाच जिंकणार! फडणवीसांचा निर्धार!!”

#मुक्तपीठ #Live "कोल्हापूर भाजपाच जिंकणार! फडणवीसांचा निर्धार!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!