Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“हृदयस्पर्शी ‘उन्मुक्त’ घडवते भावभावनांचे दर्शन”

डॉ. जितेंद्र जोशी यांचे मत: विद्याधर फडणवीस लिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन

December 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
Publication of poetry book 'Unmukta'

मुक्तपीठ टीम

“आपल्या प्रत्येकात एक कवीमन दडलेले असते. भावना, निरीक्षणे, कल्पना यांना शब्दांमध्ये गुंफून हृदयाला हात घालण्याची क्षमता कवितेमध्ये असते. चेहऱ्यावर हास्य फुलवणारी आणि डोळ्यात चटकन पाणी आणणारी कविता असते. समाजातील वेदनांची मांडणी करत अन्यायाला वाचा फोडणारी आणि दिलखुलास कौतुक करत प्रेरणा देणारीही कविता असते. अशा सगळ्याच हृदयस्पर्शी भावभावनांचे दर्शन ‘उन्मुक्त’मधून घडते,” असे मत प्रसिद्ध उद्योजक डॉ. जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
कवी विद्याधर फडणवीस लिखित मीनल प्रकाशन प्रकाशित ‘उन्मुक्त’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ लेखिका, कवयित्री शुभांगी भडभडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उद्योजक राजपाल आर्या, मीनल प्रकाशनाच्या सौ. राजहंस आदी उपस्थित होते. मोठ्या उद्योग समूहातून उच्च पदावरून निवृत्त झाल्यानंतर फडणवीस यांनी लिहिलेल्या या कविता खूपच सकस आणि प्रतिथयश कवितांसारख्या आहेत, असेही डॉ. जोशी यांनी नमूद केले.
शुभांगी भडभडे म्हणाल्या, “कविता साहित्याला समृद्ध करणारी असते. फडणवीस यांनी अत्यंत सहजपणे सर्व विषयांना स्पर्श ‘उन्मुक्त’मध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात प्रेमभाव, नातेसंबंध, आईची माया, आयुष्याची वाटचाल, समाजातील विविध घटकांचे पडसाद आणि प्रतिबिंब असे सर्वच या कवितांमध्ये आहे. या कविता वाचताना आपलेपणाची भावना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.”
विद्याधर फडणवीस म्हणाले, “नोकरीत असताना अनेकदा लिहावेसे वाटे. पण पुरेसा वेळ मिळायचा नाही. निवृत्तीनंतर मात्र कविता लिहिण्यावर लक्ष्य केंद्रित केले. आजवरच्या जगण्यातील अनुभव, निरीक्षणे यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लिखाणाचा हा छंद आणखी समृद्ध करायचा आहे.”

Tags: Dr. Jitendra JoshiUnmuktaVidyadhar Fadnavisउन्मुक्तडॉ. जितेंद्र जोशीविद्याधर फडणवीस
Previous Post

“पेपर फोडणारे फुटले नसल्याने पेपर फुटतात!” – राज ठाकरे

Next Post

राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण! कोरोनाचे ६८४ नवे रुग्ण, तर ६८६ घरी परतले!

Next Post
corona

राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण! कोरोनाचे ६८४ नवे रुग्ण, तर ६८६ घरी परतले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!