Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विदर्भातील शेवटच्या माणसांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्यावरील IAS आशुतोष सलील आणि बरखा माथुर लिखित पुस्तकाचे प्रकाशन

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Being the Change- In the Footsteps of Mahatma Book

मुक्तपीठ टीम

विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात शेवटच्या माणसांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्यावर भारतीय प्रशासकीय अधिकारी आशुतोष सलील (महाराष्ट्र कॅडर) तसेच पत्रकार बरखा माथुर लिखित “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र सदन येथे झाले.

यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्मिता व रविंद्र कोल्हे, माजी प्रशासकीय अधिकारी तसेच सध्या क्षमता निर्माण आयोग (Capacity Building Commission) चे सदस्य प्रवीण परदेशी, श्री सलील, श्रीमती माथुर यावेळी मंचावर उपस्थित होते. या उपस्थितांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.

डॉ. स्मिता व रविंद्र कोल्हे यांच्या विषयी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार विषयी उद्योजक निलेश कुलकर्णी यांनी त्यांना बोलतं केलं. पुस्तकाच्या संकल्पने विषयी सलील आणि माथुर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

महात्मा गांधीजींच्या मार्गावरून जाणाऱ्या व्यक्त‍िमत्वांच्या जगण्याचा धांडोळा “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” या पुस्तकाने घेतला आहे. प्रसिद्धी झोतात न येता या मान्यवरांनी समाजात बदल घडवून आणलेला आहे.

‘खरा भारत खेड्यात आहे आणि जर गरिबांची सेवा करायची असेल तर खेड्यात जाऊन काम करायला हवं.’ हा महात्मा गांधीजींचा संदेश अनुसरून त्यांनी त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवली असून समाजालाही त्याचा फायदा होतो हे या लोकांनी त्यांच्या जगण्यातून सिद्ध केले आहे.

डॉ. स्मिता आणि रविंद्र कोल्हे, पर्यावरणवादी बंडू धोत्रे, मोहन हिरालाल, मोहन आणि रेवाजी तोफा, अनिकेत आणि समिक्षा तसेच दिगांत आणि अनघा आमटे, मतिन भोसले, सतीश गोगुलवार आणि शुभदा देशपांडे, डॉ. आशिष आणि कविता सातव यांच्या एकूण कर्तुत्वावर आधारीत “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” हे पुस्तक आहे. हार्पर कॉलिन्स या प्रकाशन संस्थेच्यातर्फे पुस्तक प्रकाशित झाले.


Tags: Being the Change- In the Footsteps of Mahatma BookDignitaries Working for the Last Man in Vidarbhagood newsIndian Administrative Officer Ashutosh SalilJournalist Barkha MathurMaharashtra SadanmuktpeethPadma Awardघडलं-बिघडलंचांगली बातमीपत्रकार बरखा माथुरपद्म पुरस्कारबिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा पुस्तकभारतीय प्रशासकीय अधिकारी आशुतोष सलीलमहाराष्ट्र सदनमुक्तपीठविदर्भातील शेवटच्या माणसांसाठी काम करणारे मान्यवर
Previous Post

विदेशात राहणाऱ्या भारतीयांची विक्रमी कमाई! भारतात पाठवले १०० अब्ज डॉलर्स!!

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची नोंदणी सर्वांसाठी खुली

Next Post
Dr.Babasaheb Ambedkar Tourism Circuit

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची नोंदणी सर्वांसाठी खुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!