Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाच राज्यांमधील जाहीर सभा आणि रोड शोवरील बंदीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
public meetings and road shows of five election states extended till January 31

मुक्तपीठ टीम

विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असलेल्या पाच राज्यांमधील जाहीर सभा आणि रोड शोवरील बंदीत केंद्रीय निवडणूक आयोगाने ३१ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. आरोग्य खात्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या किंवा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष जाहीर सभांना २८ जानेवारीपासून आणि दुसऱ्या टप्प्यासाठी १ फेब्रुवारीपासून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांसोबत व्हर्च्युअल आढावा बैठक घेतली. आयोगाने गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी आणि आरोग्य सचिवांबरोबरही व्हर्चुअल स्वरूपात बैठका घेतल्या.

 

पाच राज्यांमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्यासह निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे यांनी सरचिटणीस आणि संबंधित उपनिवडणूक आयुक्तांसमवेत कोविड महामारीची स्थिती आणि संभाव्य कल या संदर्भात सद्यस्थितीचा सर्वंकष आढावा घेतला. आयोगाने लसीकरण स्थिती आणि मतदान कर्मचार्‍यांपैकी पात्र व्यक्तींसाठी पहिल्या, दुसऱ्या आणि वर्धित मात्रांचे लसीकरण जलदगतीने पूर्ण करण्यासंबंधी कृती आराखड्याचा देखील आढावा घेतला. आयोगाने प्रचलित परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभांसाठी निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा केली.

 

या अधिकार्‍यांकडून सूचना आणि प्रत्यक्ष स्थितीबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर, आयोगाने विविध टप्प्यांमधील प्रचार कालावधीच्या आवश्यकतांवर देखील चर्चा केली. पहिल्या टप्प्यासाठी २७ जानेवारी रोजी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ३१ जानेवारी रोजी उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप दिले जाईल.

 

सद्यस्थिती, वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन तसेच या बैठकींमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे आयोगाने पुढील निर्णय घेतला आहे.

 

३१ जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, सायकल/बाईक/वाहन रॅली आणि मिरवणुकीला परवानगी दिली जाणार नाही.

 

आयोगाने घरोघरी प्रचाराची मर्यादाही वाढवली आहे. सुरक्षा कर्मचारी वगळून ५ जणांऐवजी आता १० जणांना घरोघरी प्रचारासाठी परवानगी दिली जाणार आहे. घरोघरी प्रचारासंदर्भात इतर सूचना कायम राहतील.

 

आयोगाने जास्तीत जास्त ५०० प्रेक्षक किंवा क्षमतेच्या 5५०% किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निश्चित केलेली मर्यादा, यापैकी जी संख्या कमी असेल, त्यासह सार्वजनिक सुविधेच्या अधीन राहून आणि वाहतुकीत अडथळा येणार नाही हे सुनिश्चित करत मतदान होणाऱ्या राज्यांमध्ये मंजूर केलेल्या मोकळ्या जागी नेहमीच्या कोरोना प्रतिबंधांसह व्हिडिओ व्हॅनला प्रचारासाठी परवानगी दिली आहे. (या संदर्भातील सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे पाठवण्यात येणार आहेत). आयोग पुढील काही दिवसात या सूचनांचा आढावा घेईल.


Tags: 31 JanuaryElection Commission of IndiaNo public meetingno rallyVidhan sabha Electionकेंद्रीय निवडणूक आयोगविधानलभा निवडणूक
Previous Post

वज्रेश्वरीतील वृद्ध दांपत्याची क्रूर हत्या, मारेकऱ्यांना त्वरित जेरबंद करण्याची मागणी

Next Post

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर…आघाडी, युती आणि कोणाची असती भीती?

Next Post
balasahebh Thackeray

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर...आघाडी, युती आणि कोणाची असती भीती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!