Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वज्रेश्वरीतील वृद्ध दांपत्याची क्रूर हत्या, मारेकऱ्यांना त्वरित जेरबंद करण्याची मागणी

January 23, 2022
in घडलं-बिघडलं
0
Monica Panve demand immediate arrest of killers

मुक्तपीठ टीम

ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी या तीर्थक्षेत्राजवळील पेंढारीपाडा येथे राहणाऱ्या वृद्ध दांपत्याची अमानुष हत्या झाली आहे. मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून त्यांचे जीवन संपवले आहे. मारेकऱ्यांनी वृद्धेच्या शरीरावरील दागिन्यांना हातही लावलेला नसल्याने वेगळा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात या दुहेरी हत्येमुळे दहशत पसरली असून पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास करून मारेकऱ्यांना जेरबंद करून अद्दल घडवावी, अशी मागणी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या ठाणे जिल्हाप्रमुख मोनिका पानवे यांनी केली आहे.

Monica Panve demand immediate arrest of killers

दुहेरी हत्येने वज्रेश्वरी परिसरात दहशत

  • भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी जवळील अंबाडी रस्त्यावर असणाऱ्या पांढरीपाडा येथे ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
  • तेथे राहणाऱ्या वृद्ध पती-पत्नीची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
  • जगन्नाथ (बाळू) पाटील (वय ८३), सत्यभामा पाटील (वय ७५) अशी हत्या झालेल्या वृद्ध पती पत्नीची नावे आहेत.
  • ते वज्रेश्वरी जवळ अंबाडी रस्त्यालगत आपल्या घरात राहत होते.
  • प्रथमदर्शनी सदर हत्या कोणत्या उद्देशाने झाली आहे हे स्पष्ट झालेले नाही.
  • वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने तसेच होते, अशी माहिती पोलिसांनी दिली असल्याने उद्देश स्पष्ट होत नाही.

 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे.
मात्र, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशत परसल्याची दखल घेत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या ठाणे जिल्हाप्रमुख मोनिका पानवे यांनी पोलिसांना पत्र लिहून मागणी केली आहे. ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना दिलेल्या पत्रात सखोल चौकशी करत मारेकऱ्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी स्थानिक यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यासही त्यांनी सुचवले आहे.


Tags: BhiwandiJijau Educational Social InstitutionMonica Pavnethanevajreshwarजिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थाभिवंडीमोनिका पानवेवज्रेश्वरी
Previous Post

“नथुरामच्या आडून कोल्हे,पवारांवर देवेंद्रभक्त, संघीय पिलावळ, अण्णाबाज, आंबापैदासी यांना लिहिण्याचा नैतिक अधिकार नाही! गांधीवाद्यांचाही तोल गेला!”

Next Post

पाच राज्यांमधील जाहीर सभा आणि रोड शोवरील बंदीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ

Next Post
public meetings and road shows of five election states extended till January 31

पाच राज्यांमधील जाहीर सभा आणि रोड शोवरील बंदीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!