Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भाजपाचे मिशन दक्षिण! इलैयाराजा, पीटी उषा यांच्यासह दक्षिणेतील ४ प्रतिभावंत राज्यसभेवर!

July 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
PT Usha, llaiyaraaja and 4 nominated to Rajya Sabha

मुक्तपीठ टीम

भाजपाचे मिशन दक्षिण जोरात आहे. देश जिंकताना भाजपाचा अश्वमेध अडतो तो दक्षिणेतच. कर्नाटक वगळता यश मिळत नाही. कर्नाटकातही स्थानिक नेत्यांमुळे संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे हैदराबादमधील राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीसारखी पावलं उचलली गेलीत. आताही इलैयाराजा, पीटी उषा यांच्यासह दक्षिणेतील ४ प्रतिभावंतांना राज्यसभेवर नियक्त करण्याकडे मिशन दक्षिणचाच भाग मानलं जात आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलं आहे.

भारताची धावपटू पीटी उषा आणि प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा यांची बुधवारी राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. यासोबतच समाजसेवक आणि धर्मस्थळ मंदिराचे प्रशासक वीरेंद्र हेगडे आणि प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांचीही राज्यसभा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्याचे अभिवादन केलं आहे.

पीटी उषा ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा: पंतप्रधान मोदी

 

The remarkable PT Usha Ji is an inspiration for every Indian. Her accomplishments in sports are widely known but equally commendable is her work to mentor budding athletes over the last several years. Congratulations to her on being nominated to the Rajya Sabha. @PTUshaOfficial pic.twitter.com/uHkXu52Bgc

— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2022

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘पीटी उषा जी, प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वत्र ओळखली जाते, गेल्या काही वर्षांपासून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कार्य तितकेच कौतुकास्पद आहे. राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
  • पंतप्रधान मोदींनी पीटी उषा यांच्यासोबतचा त्यांचा फोटो शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी इलैयाराजा यांचं देखील अभिनंदन केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, इलैयाराजा यांनी आपल्या सर्जनशील प्रतिभेने प्रत्येक पिढीतील लोकांना भुरळ घातली आहे. त्यांचं कामं अनेक मानवी भावनांना सौंदर्यपूर्ण पद्धतीने प्रतिबिंबित करतं. त्यांचा जीवन प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. ते अतिशय नम्र असून, त्यांनी बऱ्याच गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे.

विजयेंद्र प्रसाद यांनी भारताची महान संस्कृती जगासमोर आणली!

 

Shri V. Vijayendra Prasad Garu is associated with the creative world for decades. His works showcase India’s glorious culture and have made a mark globally. Congratulations to him for being nominated to the Rajya Sabha.

— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2022

विजयेंद्र प्रसाद हे बाहुबलीचे लेखक आहेत. ते दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील आहेत. त्यांनी RRR, सलमान खानचा बजरंगी भाईजान, मणिकर्णिका, थलायवी यांसारख्या चित्रपटांचे स्क्रीन रायटिंग केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, ते अनेक दशकांपासून विधायक कामात गुंतले आहेत. भारताची महान संस्कृती त्यांनी जगभर नेली. त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

वीरेंद्र हेगडे संसदेचे कामकाज समृद्ध करतील!

 

Shri Veerendra Heggade Ji is at the forefront of outstanding community service. I have had the opportunity to pray at the Dharmasthala Temple and also witness the great work he is doing in health, education and culture. He will certainly enrich Parliamentary proceedings. pic.twitter.com/tMTk0BD7Vf

— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2022

वीरेंद्र हेगडे यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, वीरेंद्र हेगडे यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची संधी मिळाली आहे. आरोग्य, शिक्षण, संस्कृती या क्षेत्रात त्यांनी किती काम केले हे मी स्वतः पाहिले आहे. ते संसदेचे कामकाज नक्कीच समृद्ध करतील.


Tags: BJPIllayarajaPT UshaRajyasabhaVijeyendra PrasadVirendra Hegadeइलैयाराजापीटी उषाभाजपाविजयेंद्र प्रसादवीरेंद्र हेगडे
Previous Post

केंद्रात २ मंत्री घरी: एकाला ‘एकनाथ शिंदे’ बनणं भोवलं, तर मुख्तार अब्बास नकवींना उपराष्ट्रपतीपदाची शक्यता!

Next Post

ठाण्याचे ६७ पैकी ६६ नगरसेवक शिवसेना सोडून शिंदे गटात! ‘ती’ १ निष्ठावान नगरसेविका कोण?

Next Post
Nandini Vichare is Only Shiv Sena's loyal leader

ठाण्याचे ६७ पैकी ६६ नगरसेवक शिवसेना सोडून शिंदे गटात! 'ती' १ निष्ठावान नगरसेविका कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!