Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओबीसी आरक्षणाच्याबाजूने ना ‘ते’ ना ‘हे’? आधी केंद्र सरकार आणि आता राज्य सरकारही!

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
OBC

प्रा. हरी नरके / व्हा अभिव्यक्त!

ओबीसींसाठी सहानुभुतीचा सर्वच राजकारणी उक्तीद्वारे आव आणत असले तरी प्रत्यक्षात साऱ्यांची कृती ही कोरडेपणाचीच असल्याचे दिसत आहे. एकीकडे केंद्र सरकारचे इंपिरिकल डेटा देण्यास नकार देते आणि त्याच मुद्द्यावर ओबीसींचे राजकीय आरक्षण जाते. दुसरीकडे राज्य सरकारही केंद्राकडे बोट दाखवताना वेळकाढू धोरण राबवते. त्यामुळे आता राज्य सरकारने १ महिन्याची मुदत मागितल्याने आता पुढची सुनावणी २६ ऑक्टोबर ला होईल.

 

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण, केंद्राकडील इंपिरिकल डेटा यावर सूनावणी झाली. केंद्र सरकार हा डेटा ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्याला देणार नाही असे मोदी सरकारने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते त्यावर २०२१ च्या जनगणनेत obc डेटा जमवणार की नाही ते ठरेल. केंद्र सरकारने तर तो जमवायला प्रतिज्ञापत्रात स्पष्ट नकार दिलाय.

 

मोदी सरकार म्हणते, २०११च्या जनगणननेचा डेटा आमच्याकडे आहे, तो आम्ही अनेक योजनांसाठी वापरलाय, आजही वापरतोय. पण त्यात चुका असल्याने तो राज्यांना देणार नाही.

 

अस्वस्थ करणारे काही प्रश्न

  • प्रश्न पडतो की, डेटात चुका आहेत तर मग वापरताय कसा?
  • या चुका दुरुस्त करायला मोदी सरकारने २०१५ साली समिती नेमली. पण तिच्यावर ५ वर्षात सदस्यच नेमले नसल्याने समितीची एकही मिटींग झाली नाही.
  • २०२१ च्या जनगणनेत ओबीसीची माहिती मोदी सरकार जमवणार नाही.
  • केंद्र सरकारने डेटा दिला असता तर देशभरातले ओबीसी आरक्षण वाचवता आले असते.(मदत झाली असती.)
  • जे शपथपत्र वाचायला अर्धा तास लागतो, ते वाचायला २४ तास मिळाले होते तरी राज्य सरकारने १ महिन्याची मुदत न्यायकडे मागून घेतली. आता पुढची सुनावणी २६ ऑक्टोबरला होईल.
  • आधी १ महिना केंद्र सरकारने वेळकाढूपणा केला,आता राज्य सरकारची बारी आहे!

 

pro. hari narke

(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)


Tags: BJPOBC reservationprime minister narendra modiprof hari narkestate governmentओबीसी राजकीय आरक्षण
Previous Post

“आमदारांना आता फास्टॅगद्वारेही पथकरातून सूट मिळणार!”

Next Post

“कॅबिनेट विरुद्ध काँग्रेस? तीन सदस्यीस प्रभाग रचनेवरून आघाडीत मतभेद!”

Next Post
congress

"कॅबिनेट विरुद्ध काँग्रेस? तीन सदस्यीस प्रभाग रचनेवरून आघाडीत मतभेद!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!