Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आमदारांना आता फास्टॅगद्वारेही पथकरातून सूट मिळणार!”

फास्टॅग मिळण्यासाठीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे आदेश

September 24, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
ramraje nimbalkar

मुक्तपीठ टीम

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांच्या वाहनांना पथकरामध्ये फास्टॅगद्वारे सूट देण्यात यावी. विद्यमान सदस्यांची ऑनलाईन पद्धतीने फास्टॅगची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिवेशनादरम्यान शिबीराचे आयोजन करावे अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी दिल्या.

 

विधानभवन येथे विद्यमान आमदार तसेच माजी आमदार यांना फास्टॅगद्वारे पथकरात सूट देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी)चे मुख्य महाप्रबंधक कमलाकर फंड, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्ही. बी. राव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव राजेंद्र जवंजाळ, सभापतींचे सचिव महेंद्र काज आदीसह अधिकारी उपस्थित होते.

 

विद्यमान आमदार, अतिमहत्वाच्या व्यक्ती, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्र व राज्यशासनाची वाहने याचबरोबर विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांना पथकर शुल्क आकारणीमध्ये सूट देण्यात येते. मात्र, फास्टॅग लागू झाल्यानंतर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदारांना राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण विभागाने सहकार्य करावे असे सभापती यांनी सांगितले.

 

माजी आमदारांना फास्टॅगद्वारे पथकरात सूट मिळण्यासाठी संबंधितांकडून प्रस्ताव आल्यास, केंद्र शासनास तशी विनंती करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असेही सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

 

तसेच विद्यमान तसेच माजी आमदारांसोबत पथकर नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागण्याच्या सूचना संबंधित विभागाने त्यांना देण्यात याव्यात, असेही सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.


Tags: road taxपथकररामराजे नाईक -निंबाळकर
Previous Post

“आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण; उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये”

Next Post

ओबीसी आरक्षणाच्याबाजूने ना ‘ते’ ना ‘हे’? आधी केंद्र सरकार आणि आता राज्य सरकारही!

Next Post
OBC

ओबीसी आरक्षणाच्याबाजूने ना 'ते' ना 'हे'? आधी केंद्र सरकार आणि आता राज्य सरकारही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!