Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२५ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल प्रा. हरी नरके अस्वस्थ: “कोट्यवधी दु:खात असताना जुनी दुखणी का उकरता? २५ वर्षात विचार बदलतात!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
hari narake

प्रा. हरी नरके

लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर माझी एक खूप जुनी पोस्ट सोशल मीडियावर फिरत असल्याचे एका मित्राने कळवले. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अशा पोस्ट मुद्दाम शोधून काढून फिरवणे औचित्याला धरून नाही. देशातील कोट्यवधी लोक दुःखात असताना अशी जुनी दुखणी उकरून काढणे तारतम्याने वागण्याला फाटा देणे होय.

 

१९९६ सालच्या अनुभवावर मी ती पोस्ट लिहिली होती. त्याला आता २५ हुन अधिक वर्षे होऊन गेली. जुन्याच जखमा किती दिवस कुरवाळत बसायच्या? आता माझे विचार बदललेले आहेत.

 

लताबाईंनी टोकाचे दारिद्र्य अनुभवलेले होते. वडिलांच्या व्यसनापोटी आलेल्या गरिबीचे चटके सोसल्यानंतर जर त्या हिशोबी बनल्या असतील, व्यवहारी आणि आर्थिक बाबतीत अगदी कंजूशही बनल्या असतील तरी ते वागणे समजून घ्यायला हवे असे मला आज वाटते. त्यांनी सहीला पैसे मागितले, ते तेव्हा मला खटकले पण आता असे वाटते की त्यांच्या नावाला वलय होते, आहे. ब्रँड नेमचे सहीचे पैसे घेणे हा व्यवहार आहे.

 

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीते गायली असती तर मला अधिक आनंद झाला असता. त्यांनी नकार दिला याचे मला दुःख आहे. पण त्यासाठी केवळ मी त्यांच्या विरोधात लिहिणार नाही. लताबाईंना तसा निर्णय घ्यावासा वाटला असेल तर ठीक आहे. तो त्यांचा व्यावसायिक निर्णय होता.

 

त्यांची आई आणि वडील दोघेही सामाजिक प्रतिष्ठा नसलेल्या वर्गातून आलेले होते. त्याचे भरपूर दुःख लताबाईंनी भोगले असणार. अशावेळी आपली खरी ओळख, जात चोरून आपण उच्चजातीय असल्याचे जर त्या सांगत असतील व म्हणून बाबासाहेबांच्या गाण्यांना नकार देत असतील तर जे खेदजनक आहे पण अशी जात चोरावी लागणे हे अधिक भयंकर आहे. खरं तर त्यांना बाबासाहेब यामुळेच अधिक आपले वाटायला हवे होते. ज्यांनी कोट्यवधी वंचितांना, मागासांना आत्मसन्मान दिला, स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. पण तरीही मी लताबाईंनी घेतलेला निर्णय समर्थन करण्याजोगा नसला तरी समजून घेतला पाहिजे असेच मानतो.

 

त्यांची सामाजिक-राजकीय मतं हिंदुत्ववादी होती. ती मला पटत नसली तरी ती बाळगण्याचा त्यांना अधिकार होता असेच मी समजतो. त्यांच्या यशात मुख्यतः गीतकार, संगीतकार नी मग गायिका म्हणून त्यांचा वाटा होता हे खरे असले तरी जे यशस्वी असते त्याच्या आरत्या समाज करतो. ही समाजरीत आहे. तुम्हाला ती पटो अगर न पटो. ते वास्तव आहे.

 

लताबाईंची अनेक गाणी मला आवडतात, जगायला बळ देतात. त्यांची गाणी कोट्यावधी लोकांच्या काळजात आहेत. त्यांचा आदर आपण करायला हवा. त्यांचं जाणं मला उदास करून गेलंय. त्यांना विनम्र आदरांजली. त्यांचं बालपण नी उमेदीची वर्षे खडतर होती. त्यांचं उत्तर आयुष्य मात्र सुखात गेलं सगळे मानसन्मान त्यांना लाभले. जाताना त्या सुमारे ४०० कोटी रुपयांची मालमत्ता मागे सोडून गेल्या. त्याना दीर्घायुष्य लाभले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्या गेल्या. तरीही त्या हव्या होत्या.

 

लताबाईंची गाणी आठवू या.त्यांच्या मृत्यूनन्तर माझी जुनी पोस्ट निरस्त झाली आहे, कृपया ती आता फिरवू नका.


Tags: lata mangeshkarmuktpeethpro. hari narakesocial mediaviral postsप्रा. हरी नरकेमुक्तपीठलता मंगेशकरलताबाईंची गाणीसोशल मीडिया
Previous Post

सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती: धर्मसंसदेतील विषारी भाषणं फेटाळली, हे हिंदुत्व नाही!

Next Post

किशोरी शहाणेंच्या कारला ट्रकची धडक!

Next Post
kishori shahane

किशोरी शहाणेंच्या कारला ट्रकची धडक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!