मुक्तपीठ टीम
इंडिगो या विमान कंपनीने आपल्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा केला आहे. इंडिगोने विमानतळांमधील बोर्डिंग गेटवर प्रवाशांना लांब रांगापासून वाचवण्यासाठी प्रायोरिटी बोर्डिंग सुविधा सुरू केली आहे. इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशी या सुविधेचा वापर बुकिंग प्रक्रियेदरम्यान इंडिगोच्या वेबसाइटवर, मोबाइल अॅपवर किंवा ग्राहक सेवेला कॉल करून करू शकतात. बोर्डिंग गेटवर असणाऱ्या प्रवाशांच्या लांब रांगापासून वाचवण्यासाठी प्रायोरिटी बोर्डिंग सुविधा सुरू केली आहे.
माय बुकिंग पोर्टलद्वारे सेवा
- मायबूकिंग पोर्टलद्वारे प्रति फ्लाइट फक्त ४०० रुपये भरून ही सुविधा बुक करता येते.
- सुरुवातीला ही सुविधा मोठ्या शहरांसाठी उपलब्ध असेल.
- नंतर ही सेवा संपूर्ण देशांतर्गत उड्डाण नेटवर्कसाठी टप्प्याटप्प्याने आणली जाईल.
- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रति फ्लाइट मर्यादित संख्येने प्रवाशांसाठी हा पर्याय उपलब्ध असेल.
पंधराव्या वर्षातील प्रवासानिमित्त खास भेट
- इंडिगोच्या ऑपरेटिंगला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
- त्या निमित्ताने कंपनीने प्रवाशांना स्वतःसाठी एक खास भेट देण्याविषयी सांगितले होते.
- त्यानंतर विमान कंपनीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनवर ९१२ रुपयांपासून भाडे देऊ केले होते.
- फास्ट फॉरवर्ड, ६ ई फ्लेक्स, ६ ई-बागपोर्ट यासारख्या ६-अॅड-ऑनसह सेवा इंडिगोकडून फक्त ३१५ रुपयांमध्ये पुरवल्या जात आहेत.
- तसेच प्रवाशांना ३१५ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत कार रिटेल सेवा दिली जात आहे.