Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे पुन्हा सुरु होणार…आता यादीत कोणते देश?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pn narendra modi

मुक्तपीठ टीम

 

कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौरे थांबवले होते. पण आता परदेश दौऱ्यांसाठी प्रसिद्ध असणारे पंतप्रधान पुन्हा भारताबाहेर जाणे सुरु करणार आहेत. मोदींनी सत्तेवर आल्यापासून परराष्ट्रांशी संबंध सुधारणे आणि मजबूत करण्यासाठी अनेक दौरे केले. आता ते पुन्हा दौऱ्यांवर निघणार आहेत.

 

या महिन्याच्या २६ तारखेला पंतप्रधान मोदी बांगलादेशचा दौरा करणार आहेत. या बांगलादेश दौर्‍यापासूनच मोदींच्या परदेशी दौर्‍यास सुरुवात होणार आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयात पंतप्रधान मोदींच्या मे महिन्यातील यूरोपियन युनियन दौऱ्याची तयारी जोरात सुरु आहे. युरोपियन युनियन दौर्‍यानंतर मोदी जून २०२१ मध्ये ग्रुप -७ देशांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी ब्रिटनलाही भेट देऊ शकतात. युरोपियन युनियन आणि ब्रिटनच्या भेटीदरम्यान पंतप्रधान त्यांच्या प्रवासाच्या मार्गात काही इतर देशांचा समावेश करू शकतात.

परदेशी पाहुणे भारतात येणार असल्याची चर्चा

  • दरम्यान, पंतप्रधान दौऱ्यासोबत काही परदेशी पाहुणे भारतात यावेत यासाठीही चर्चा सुरू आहे.
  • सर्वप्रथम, भारतीय विदेश मंत्रालय जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यासंदर्भात जपान आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयांच्या संपर्कात आहे.
  • हे दोन्ही राष्ट्रप्रमुख डिसेंबर २०१९ मध्ये भारत दौर्‍यावर येणार होते, परंतु काही कारणांमुळे त्यांचे दौरे पुढे ढकलण्यात आला होते.
  • यावर्षी भारत ब्रिक्स संघटनेचा प्रमुख आहे. त्यामुळे जर कोरोनामुळे परिस्थिती अधिक बिघडली नाही, तर २०२१ च्या मध्यानंतर ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीनचे प्रमुख भारताला भेट देऊ शकतात.

 

पंतप्रधान नेहमीप्रमाणे परदेशी दौऱ्याची सुरुवात शेजारील देशांपासून करतात. २६ आणि २७ मार्च २०२१ रोजी बांगलादेश दौऱ्यानंतर ते नेपाळलाही भेट देतील. तथापि, शेजारील नेपाळमधील राजकीय वातावरण बघून हा निर्णय घेतला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुप्रतिक्षित बांगलादेश दौर्‍याच्या अगोदरच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आज (४ मार्च) ढाका येथे जाणार आहेत. जयशंकर हे ढाकामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना तसेच तेथील परराष्ट्रमंत्री यांची भेट घेणार आहेत. असे म्हटले जात आहे की, जयशंकर मोदींच्या या दौऱ्या दरम्यान होणाऱ्या घोषणांबद्दल बंगलादेशाच्या अधिकाऱ्यांशी अंतिम चर्चा करणार आहेत.

पंतप्रधानांच्या बांगलादेश दौऱ्यात काय?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंधाना ५० वर्ष पूर्ण होण्यासोबत बांगलादेश स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होण्याच्या संबंधित आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
  • या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांकडून बांगलादेशासाठी अतिरिक्त मददीची घोषणाही केली जाऊ शकते.
  • व्यापार सहकार्याबाबतही दोन्ही देशांमध्ये एक नवीन घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
  • बांगलादेशाचा ऊर्जापुरवठा वाढवण्याबाबत भारताकडून नवीन घोषणा केल्याचीही चर्चा आहे.

Tags: PM Narendra modiPMOपंतप्रधान नरेंद्र मोदीपरदेशी दौरा
Previous Post

‘या’ अॅपच्या लाइट वर्जनवरही मिळणार टिकटॉकसारखंच फिचर

Next Post

जळगावनंतर औरंगाबाद प्रकरणावर विधीमंडळात वाद

Next Post
ajitdada pawar

जळगावनंतर औरंगाबाद प्रकरणावर विधीमंडळात वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!