Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जळगावनंतर औरंगाबाद प्रकरणावर विधीमंडळात वाद

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajitdada pawar

मुक्तपीठ टीम

राज्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये आता औरंगाबादच्या पदमपुरा कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्‍टरला बेदम मारहाण केली. जळगावातला वाद ताजा असतानाचं आता विधीमंडळात याप्रकरणावर वाद होत आहेत. विरोध पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला अजून किती बलात्कार आणि किती विनयभंग पाहिजे, असा संतप्त सवाल सरकारला केला आहे. मात्र, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, तुम्हाला अजून किती बलात्कार आणि विनयभंग पाहिजेत. कोणतीही सुरक्षा पुरवली जात नाही. कोणतीही एसओपी नाही. या घटनेची तातडीनं माहिती द्या, असं म्हणत फडवणवीसांनी सरकारला जाब विचारला. यावर उत्तर देताना तिथे बलात्कार झालेला नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पवार म्हणाले, औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. महिलेने कोणतीही तक्रार केलेली नाही. महिलेचा पती आणि संबंधित डॉक्टर मित्र आहेत. मात्र,संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. पवार यांच्या या विधानामुळं प्रकरणाला आता वळण आलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त पांडे यांनी दिले आहेत. राज्यातील कोरोना सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोरोना सेंटरसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधीमंडळात उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी याबद्दल माहिती दिली. “


Tags: Deputy Chief Minister Ajit Pawarअजित पवारमहाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Previous Post

पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे पुन्हा सुरु होणार…आता यादीत कोणते देश?

Next Post

आजारांवर मात करण्यासाठी खरंच चालणं ठरतं फायद्याचं?

Next Post
Walking

आजारांवर मात करण्यासाठी खरंच चालणं ठरतं फायद्याचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!