मुक्तपीठ टीम
राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयकडून दिलासा मिळाला आहे. प्रवीण दरेकर यांचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अनेक वर्ष तपास सुरू आहे त्यामुळे अटकेची आवश्यकता नसल्याचं, उच्च न्यायालायने सांगितलं आहे. तसेच, अटक झाल्यास ५० हजाराच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत. मी आघाडीवर घोटाळ्यांचे आरोप करत असल्यानं माझ्यावर सूडबुद्धीनं कारवाई केल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.
प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा असल्याचा प्रवीण दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात चौकशीसाठी पोलीस कोठडीची कोणतीच गरज नव्हती. न्यायालयाने हीच गोष्ट लक्षात घेऊन प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, असेही प्रवीण दरेकर यांच्या वकिलांनी सांगितले. प्रवीण दरेकर यांना अटक झाली तरी त्यांना बाँडवर सोडण्यात येईल, अशी माहिती अखिलेश चौबे यांनी दिली.दरेकरांना अटकपूर्वी जामीन मंजूर झाल्यानंतर महाविकास आघाडीला धक्का असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
…तेवढे मी सरकारच्या कारभारावर ताशोरे ओढणारच!
- आघाडी सरकारने राज्यात विरोधकांचा छळवाद मांडला आहे.
- त्याचं चोख उत्तर न्यायालयाने दिलासा देऊन दिलं आहे. ज्या गोष्टीत तथ्य नव्हते.
- गुन्हाही होत नव्हता.
- पण जोरजबरदस्तीने गुन्हे दाखल केले होते.
- कुंभाड रचलं होतं.
- स्वत: सरकार त्यात हस्तक्षेप करत होते.
- मी स्वत: पाहत होतो.
- पण आपल्या देशात लोकशाही, संविधान मजबूत आहे.
- मनमानी करता येत नाही.
- न्यायालयाने मनमानीला जोरदार थप्पड लगावली आहे.
- दरेकर यांचं तोड दाबण्याचा प्रयत्न होता.
- पण जेवढे विरोध करतील तेवढे मी सरकारच्या कारभारावर ताशोरे ओढणारच, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.