Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शेतकऱ्यांच्या मनात असंतोष, सरकारला काळजीच नाही!”

प्रविण दरेकरांचा नाशिकच्या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर आरोप

March 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

नाशिक जिल्ह्यात झालेल्या गारपिटीने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. त्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकं ह्या आस्मानी संकटाने हिरावले. परंतु संवेदनाहीन सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, या सरकारने बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे, अशा तीव्र शब्दांत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

 

नाशिक दौऱ्यावर असलेल्या दरेकर यांनी आज सटाणा तालुक्यातील गारपीटग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दरेकर यांनी दिले.

 

शेतकऱ्यांच्या भीषण वास्तव जाणून घेताना दरेकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही सभागृहात मांडत असतो, सलग ३ वर्ष हा भाग अवकाळीमुळे त्रस्त असल्यामुळे ज्या पद्धतीने शेतकरी उद्ध्वस्त झाला त्यावर सरकारने गतीने उपाययोजना करणे आवश्यक होते, पण तसे काही झाले नाही. उलटपक्षी जिल्हा बँके कडून मुद्दली पेक्षा मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जात आहे, तसेच भोगवटाधार २ च्या जमिनी १ करण्यात मोठया प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी सुद्धा शेतकऱ्यांनी व्यक्त केले असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात न काढता अडचणीत आलेल्या कर्जदाराला कर्जाची पुनर्बांधणी करण्यासाठी भाग पडण्यास प्रयत्न करू. शासनाने गारपिटीमुळे नुकसान ग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, बियाणे नष्ट झाले आहेत शेतकऱ्यांना ओ.टी.एस द्यावा अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

 

नाशिकचा शेतकरी हिम्मतवान आहे, ते खचले आहेत परंतु हरले नाहीत. उभारी घेण्याची ताकद बाळगून आहे यासाठी शासनाने विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मदतीला उभं राहावं, अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु केवळ ५०-६० टक्के पंचनामे झालेले दिसून येत आहे त्यामुळे सरकारची संवेदना हरवली असल्याची टीका दरेकर यांनी केली.

 

शेतकऱ्यांनी आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही त्यामुळे विश्वास ठेवावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने आपले सर्व विषय मार्गी लावू असे आश्वासन दरेकर यांनी दिले. अनेक प्रकरण दौऱ्या अंतर्गत पुढे येतील त्यामुळे आज माझ्या दौऱ्या नंतर सरकार हललेलं दिसेल याची मी ग्वाही देतो तसेच राज्यसरकार बद्दल तीव्र असंतोष शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि या असंतोषाचा बांध फुटू नये याची काळजी शासनाने घ्यावी, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

शेतकऱ्यांच्या बाबतीत सुलतानी पद्धतीने विचार करून चालणार नाही, सहानुभूतीने विचार करावा लागेल असे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.


Tags: devendra fadanvisFarmernashikpravin darekarनाशिकनेते देवेंद्र फडणवीसप्रविण दरेकर
Previous Post

अबब! मुंबई महानगरपालिकेत ३८१२८ रिक्त पदे

Next Post

फडणवीसांकडून ठाकरे सरकारचं थोडंसं कौतुक…पण टोमणेच फार!

Next Post
df

फडणवीसांकडून ठाकरे सरकारचं थोडंसं कौतुक...पण टोमणेच फार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!