मुक्तपीठ टीम
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांची क्रेझ घटत आहे तर, इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. प्रवैग इलेक्ट्रिकने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार प्रवैग DEFY सादर केली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. या इलेक्ट्रिक कारचे काही खास फिचर्स जाणून घेवूया…
प्रवैग DEFY फिचर्स…
- यात ९०.२kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरला आहे.
- ही बॅटरी इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली असते.
- या इलेक्ट्रिक कारची मोटर ४०२ बीएचपी पॉवर आणि ६२० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
- बॅटरी पॅक ०-८० टक्के चार्ज होण्यासाठी ३० मिनिटे लागतील.
- या इलेक्ट्रिक कारमध्ये एका चार्जमध्ये ५०० किलोमीटरपर्यंतची रेंज देण्याची क्षमता आहे.
- ही बॅटरी १० लाख किलोमीटरहून अधिक धावू शकते.
- यात मल्टी कनेक्टिव्हिटी सपोर्ट, ट्विन सनरूफ, कनेक्टेड कार टेक, वायरलेस मोबाइल चार्जर, एअर प्युरिफायर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल कॅप्टन सीट, मागील सीटवर टचस्क्रीन सिस्टम तसेच फ्लेर्ड फीचर्ससह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
- फ्रंट फेंडर्स, मल्टी-पॉक्स अलॉय व्हील, स्टिरिओ सिस्टम, टेलगेटवर एलईडी स्ट्रिप आणि सर्व व्हील ड्राइव्ह उपलब्ध आहेत.
- या इलेक्ट्रिक कारची किंमती ३९.५० लाख रुपये, एक्स-शोरूम दिल्ली आहे.
- कंपनीने ही इलेक्ट्रिक कार ११ कलर ऑप्शनमध्ये सादर केली आहे.