Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘राजा, तमारा रामराज्यमा शववाहिनी गंगा’ म्हणणाऱ्या कवयत्रिला नक्षलवादी संबोधणाऱ्यांनी साहित्य परंपरेला काळिमा फासला!

ज्येष्ठ लेखिका-कवयित्री प्रज्ञा दया पवारांकडून तीव्र प्रतिक्रिया

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
parul khakkar

मुक्तपीठ टीम

कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटते उत्तर प्रदेशात गंगा नदीत मृतदेह वाहण्याच्या दृश्यांनी खळबळ माजवली होती. त्याचे पडसाद आता साहित्य क्षेत्रात उमटताना दिसत आहेत. गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांची त्यावर भाष्य करणारी कविता देशभर चर्चेत आली. आता गुजरात साहित्य परिषदेने खक्कर यांना नक्षली साहित्यिक संबोधले आहे. त्यावर ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

प्रज्ञा दया पवार यांची प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात:

गुजरात साहित्य अकादमीच्या ‘शब्दसृष्टी’मध्ये अकादमीचे अध्यक्ष विष्णु पांड्या यांनी त्यांच्या संपादकीयामध्ये पारुल खक्कर या कवयित्रीला नक्षलवादी, अराजकतावादी ठरवलं आहे. ‘त्या ‘ कवितेला (कवितेवर संपादकीय असूनही कवितेचं ‘राजा, तमारा रामराज्यमा शववाहिनी गंगा’ हे शीर्षक मात्र त्यातून पूर्णपणे गायब आहे) कविता म्हणावं का असेही फिजूल प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

 

गंमत याची वाटते, की याच पांड्या यांनी एके काळी पारुल खक्कर यांचा गौरव करताना ‘त्या पुढच्या गुजराती कवितेतील तारा आहेत’, असे उद्गार काढले होते.

 

मुळात पारुल यांनी त्यांच्या कवितेत माँ गंगा प्रेताने भरुभरुन वाहतेय याविषयी तीव्र विलाप व्यक्त केला आहे. ही कविता एका आत्यंतिक सश्रद्ध अशा स्त्रीची अगदी आतून आलेली सच्ची भावना आहे. आतापावेतो श्रद्धेपोटी धार्मिक भजने लिहिणाऱ्या पारुलताई गंगेच्या या अपरुपाने अक्षरशः विद्ध झाल्या आहेत. ही कविता वाचताना त्यातल्या आक्रोशाने, वैयर्थतेने, राजा नग्न असल्याच्या आणि रंगाबिल्लाच्या धीट उल्लेखाने, त्यातल्या प्रखरतेने, तीव्र उपहासाने आपल्याला हलवून सोडते.

 

खरं तर या कवयित्रीने आरसा ठेवलाय आपल्यासमोर. त्यात दिसणारी प्रतिमा प्रधानसेवकांना आणि त्यांच्या परममित्राला रुचणारी नाही हे तर उघडच आहे. करोना महामारीतल्या नियोजनाचा गलथानपणा, ढिसाळपणा, कोलमडून पडलेलं व्यवस्थापन, लाखो लोकांच्या मृत्यूची झाकपाक आणि अवघ्या देशाला आलेली स्मशानवत अवकळा..
पैशांअभावी गंगेत सोडावी लागणारी प्रेतं.. एखाद्या टिपकागदासारखा हा अवघा कल्लोळ टिपून घेणारी संवेदनशीलता आता अराज्यवादी, नक्षलवादी ठरवली गेली आहे.

 

प्रधानसेवकाचे इमानी कुत्रे बनून स्वतःची जागा सेफ करणारे हे पांड्यासारखे सरकारी लेखनकामाठी करणारे म्हणजे अवघ्या गुजराती साहित्याच्या समृद्ध परंपरेला काळिमा फासणारे आहेत.

 

२००२ मध्ये जेव्हा रातोरात वली दखनीची कबर भुईसपाट केली गेली आणि त्यावर गुळगुळीत डांबरी सडक बनवली गेली तेव्हा त्याची पाठराखण करणारे हेच साहित्यिक होते. एका अर्थाने या सरकारधार्जिण्या साहित्य व्यवहारावर पारुल खक्कर यांनी खणखणीत चपराक लगावली आहे. म्हणूनच सत्ताधाऱ्यांचे पाळीव साहित्यिक त्यांच्यावर आगपाखड करत आहेत.

 

मी पारुल यांच्या निर्भयी अभिव्यक्तीला सलाम करते आणि त्यांना नक्षलवादी ठरवणाऱ्यांचा तीव्र निषेध करते.
“वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे”
म्हणणाऱ्या गुजरातच्या भूमीतला आजचा धीट, खणखणीत आवाज पारुल खक्करच्या रुपाने असाच गुंजत राहो अशी इच्छा व्यक्त करते.

 

Pradnya Daya Pawar

(प्रज्ञा दया पवार ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री आहेत.)


Tags: Pradnya Daya Pawarपारुल खक्करप्रज्ञा दया पवार
Previous Post

अकरा वर्षापासून गायब तरुणी होती शेजारच्याच घरात…प्रियकरासोबत!

Next Post

कोरोना मृतदेहांमुळे गंगा संसर्गित तर झाली नाही? केंद्र सरकारने नेमली समिती

Next Post
Ganga-River

कोरोना मृतदेहांमुळे गंगा संसर्गित तर झाली नाही? केंद्र सरकारने नेमली समिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!