Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना मृतदेहांमुळे गंगा संसर्गित तर झाली नाही? केंद्र सरकारने नेमली समिती

June 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ganga-River

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले होते, त्यावेळी गंगेत मृतदेह सापडल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले. यामुळे देशात एकच खळबळ उडाली. त्यावरून राजकारणही खूप रंगलं. तसं नसल्याचे सांगत जागतिक पातळीवर भारताची बदनामी केल्याचा ठपका माध्यमांवर ठेवण्यात आला. पण आता मृतदेहांमुळे गंगा दूषित झाली आहे का, यासाठी तपासणी करण्यात येत आहेत. त्यात कोरोना विषाणूंचाही शोध घेतला जाणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या ‘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा’ च्या वतीने तपासणीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम लखनऊच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टॉक्सोलॉजिकल रिसर्च यांच्यावर सोपवण्यात आले आहे.

 

कोरोना मृतदेह आढळले त्या ठिकाणी होणार तपासणी

  • पहिल्यांदा मृतदेह बक्सरच्या घाटावर गंगेमध्ये वाहताना दिसले.
  • यामुळेच आयआयटीआर अॅनालिस्टच्या पथकाने प्रथम बक्सरकडून गंगेच्या पाण्याचे नमुना घेतले.
  • बक्सरबरोबरच पथकाने पाटणा, भोजपूर आणि सारण येथूनही नमुने घेतले आहेत.
  • बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळदेखील गंगेच्या पाण्यातील बदलांची चौकशी करीत आहे.
  • हे प्रकरण विषाणूशी संबंधित आहे, म्हणून हे काम आयआयटीआरला देण्यात आले आहे.

 

गंगा घाटांवरील पाण्याची होणार तपासणी

  • आयआयटीआरची तीन सदस्यांची टीम बिहारमध्ये गंगाच्या पाण्याचे नमुने घेण्यासाठी आली होती.
  • बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकासह पथकाने विविध जिल्ह्यांमधील गंगा घाटांवर जाऊन स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नमुने गोळा केले.
  • या पथकाने १ जूनला बक्सरमध्ये गंगेच्या पाण्याचे नमुने आणि ५ जून रोजी पाटणा, भोजपूर आणि सारण येथे घेतले.
  • नमुने तपासल्यानंतर गंगेच्या पाण्यात कोरोना विषाणू आहे की नाही हे तज्ज्ञ तपासतील.

पुन्हा होणार गंगेच्या पाण्याची तपासणी

  • बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार नमुना घेण्याची ही पहिली फेरी आहे.
  • पुन्हा नमुने घेतले जातील, यासाठी टीम पुन्हा बिहारमध्ये येईल.
  • दुसऱ्या फेरीत गंगेच्या पाण्याचे नमुने पुन्हा घेतले जातील.
  • कारण तपासणीत पुढे आलेल्या निकालांची आणखी पुष्टी करता येते.

Tags: central teamcoronadeadbodiesganga riverइंडियन इंस्टिट्यूट ऑफ टॉक्सोलॉजिकल रिसर्चकोरोनागंगामृतदेह
Previous Post

‘राजा, तमारा रामराज्यमा शववाहिनी गंगा’ म्हणणाऱ्या कवयत्रिला नक्षलवादी संबोधणाऱ्यांनी साहित्य परंपरेला काळिमा फासला!

Next Post

सर्वोच्च न्यायालयाच्या धक्क्यानंतर परमबीरांचे काय होणार?

Next Post
parambir singh

सर्वोच्च न्यायालयाच्या धक्क्यानंतर परमबीरांचे काय होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!