Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सचिन वाझेची सुपारी, प्रदीप शर्मांनी ४५ लाखात वाजवला मनसुख हिरेनचा गेम!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pradip sharma mansukh hiren Sachin Waze

मुक्तपीठ टीम

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला आता नवं वळण आले आहे. एनआयएने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने हिरेन यांची हत्या करण्यासाठी शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचा दावा एनआयएने केला आहे. प्रदीप शर्मांच्या जामीन अर्जाला विरोध करताना एनआयएने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी असल्याने ते त्याच्याविरुद्धचे पुरावे आणि साक्षीदारांशी छेडछाड करू शकतात.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी उभी केल्यानंतर काही दिवसांतच गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला होता. एनआयएने जून २०२१ मध्ये या प्रकरणी प्रदीप शर्माला अटक केली होती. तेव्हापासून प्रदीप शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत. यावर्षी मार्चमध्ये एनआयए न्यायालयीने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनू मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या जामीन अर्जाला न्यायमूर्ती एएस चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्या खंडपीठासमोर विरोध करत प्रदीप शर्मा निर्दोष नसल्याचे सांगितले.

मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीतच हा कट रचण्यात आला होता…

  • मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीत प्रदीप शर्माने हत्येचा कट रचल्याचे एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.
  • प्रतिज्ञापत्रानुसार, मनसुख हिरेन यांनी स्वतः स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ अँटिलियाजवळ पार्क करण्यास नकार दिला होता.
  • मात्र या संपूर्ण कटाची त्याला कल्पना आली होती.
  • त्यामुळे प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला.
  • या कामासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिले.
  • एनआयएने या प्रकरणात प्रदीप शर्मा आणि इतर सहआरोपींना यूएपीए (बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा) अंतर्गत अटक केली आहे.
  • एनआयएने हिरेनची हत्या मोठ्या कटाचा भाग असल्याचे म्हटले आहे.

Tags: mansukh hirenNIApradeep sharmasachin vazeएनआयएप्रदीप शर्मामनसुख हिरेनसचिन वाझे
Previous Post

किती चालतो आवाज? काय सांगतो कायदा? सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निकालांमध्ये नेमकं काय?

Next Post

“नाशकात शिवसेना – भाजपाचा संगनमताने भ्रष्टाचार!” राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवारांकडे तक्रार

Next Post
Shivsena BJP And NCP

"नाशकात शिवसेना - भाजपाचा संगनमताने भ्रष्टाचार!" राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवारांकडे तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!