Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“नाशकात शिवसेना – भाजपाचा संगनमताने भ्रष्टाचार!” राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवारांकडे तक्रार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shivsena BJP And NCP

मुक्तपीठ टीम

कोरोना काळात नाशिक मनपात भाजपाने भ्रष्टाचार केला. भाजपाचा हा भ्रष्टाचार शिवसेनेच्या संगनमतानेच झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी चौकशीची घोषणा केली आहे. पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत माजी गटनेते गजानन शेलार यांनी मनपात झालेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले.

भाजपाने मनपात गैरप्रकार केले असून, शिवसेनेचे सहकार्य!

  • राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत शेलार यांनी अनेक तक्रारी केल्या.
  • भाजपाने मनपात अनेक बाबींमध्ये गैरप्रकार केले असून, त्यास शिवसेनेच्याच काही पदाधिकार्‍यांनी सहकार्य केल्याचे सांगत महासभा ऑनलाइन होत असल्याने तक्रारी करता आल्या नसल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले.
  • त्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपाच्या कामकाजाबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रकरण पोहोचविण्यात आले असून, ८०० कोटींचे भूसंपादन कसे झाले, याचा छडा लावण्यात येणार असल्याचे नमूद केले.
  • पुणे, पिंपरी-चिंचवड येथे टीडीआरद्वारे भूसंपादन केले जात असताना नाशिक मनपात मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला गेल्याचे पवार यांनी सांगितले.

शिवसेनेशी आघाडी नको…

  • मनपा निवडणुकीसाठी प्रभागरचना करताना शिवसेनेने राष्ट्रवादीला डावलले.
  • शिवसेनेने त्यांच्या सोयीनुसार प्रभाग तयार करून घेतले असून, याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना साधी विचारणाही कधी झाली नाही.
  • राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी आम्हाला विचारले जात नसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली.
  • राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढविल्यास किमान ६० जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
  • राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या जागांवर शिवसेना हक्क सांगत आहे.
  • त्यामुळे प्रभागरचनांमध्ये डावलणार्‍या पक्षाशी आघाडी नको.

Tags: ajit pawarBJPnashiknashik municipal coNCPShivsenaउपमुख्यमंत्री अजित पवारनाशिक मनपाभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Previous Post

सचिन वाझेची सुपारी, प्रदीप शर्मांनी ४५ लाखात वाजवला मनसुख हिरेनचा गेम!

Next Post

इस्रोचं आता मिशन शुक्र! डिसेंबर २०२४ मध्ये शुक्रयान-1 पाठवणार!!

Next Post
Shukrayan 1

इस्रोचं आता मिशन शुक्र! डिसेंबर २०२४ मध्ये शुक्रयान-1 पाठवणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!