मुक्तपीठ टीम
नाहूर आणि मुलुंड दरम्यान दोन गर्डर विंच आणि पुली पद्धतीने सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे सर्व सहा मार्गांवर विशेष रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे.
हा ब्लॉक ०७/ ०८.०१.२०२३ (शनि/रवि मध्यरात्री) ०१.२० ते ०४.२० पर्यंत ५व्या आणि ६व्या मार्गावर आणि ०१.२० ते ०५.१५ पर्यंत विक्रोळी आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर चालवला जाईल.
उपनगरीय गाड्यांच्या चालण्यावर होणारा परिणाम
- ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा उपलब्ध असणार नाही..
- ब्लॉकपूर्वी कल्याणकडे जाणारी शेवटची लोकल: S1 कर्जत लोकल सीएसएमटीहून ००.२४ वाजता सुटते.
- ब्लॉकनंतर कल्याणकडे जाणारी पहिली लोकल: S3 कर्जत लोकल सीएसएमटीवरून ०४.४७ वाजता सुटते.
- कल्याणहून ब्लॉकनंतर सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल: TL-4 CSMT लोकल कल्याणहून ०४.४८ वाजता सुटते.
मेल एक्सप्रेसवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे असतील:-
- ट्रेन क्रमांक-११०२० कोणार्क एक्स्प्रेस ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल.
- ट्रेन क्रमांक-१२८१० हावडा-मुंबई सीएसएमटी मेल दादर येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल.
खालील गाड्या निर्धारित वेळेच्या ४० ते ६५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
- ट्रेन क्रमांक-१८०३० शालीमार एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक-१८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक-१२१३४ मंगलोर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक-२०१०४ गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक-१२७०२ हैदराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्याब गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
दिनांक: ६ जानेवारी २०२३ प्रप क्रमांक २०२३/०१/१० सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.