मुक्तपीठ टीम
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आणि इतर मागण्यासाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच संपामुळे सरकारविरोधात समाजातही असंतोष माजू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अनिल परब यांनी ताठर भूमिका सोडत मध्यम मार्गाची भाषा सुरु केली. मंगळवारी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला. आताही त्यांची कर्मचारी नेते, प्रतिनिधींशी बोलणी सुरु आहेत.
कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढीचा पर्याय
- कामगारांना जे जे हवं आहे ते आम्ही देत आहोत.
- एका बाजूने समितीची प्रक्रिया सुरू आहे.
- याला बराच कालावधी लागणार आहे.
- तिढा कायम राहू नये, यासाठी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढीचा पर्याय दिला आहे.
- दरम्यान याच संदर्भात बुधवारी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये आज बैठक होणार आहे.
संप मागे घेण्याचे परबांचे आवाहन
- कामगारांनी अधिक ताणू नये.
- सरकार दोन पावलं पुढे यायला तयार आहे.
- तुम्ही दोन पावलं मागे या.
- चर्चेने मार्ग निघत असतो.
- एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
- त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असे आवाहन देखील परब यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता
- संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी सांगितले होते.
- त्यामुळे आजच्या बैठकीत संपावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- न्यायालयाने विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे.
- समितीचा जो काही अहवाल येईल तो सरकार मान्य करेल.
- पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही.
- त्यामुळे कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय दिला आहे.
- एसटी कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
- उच्च न्यायालयाने समिती बनवली आहे.
- समितीकडे सध्या हा विषय आहे.
- १२ आठवड्यात अहवाल द्यायचा आहे.
- अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री तो कोर्टात सादर करतील, कोर्टाच्या आदेशाचं कोणीच उल्लंघन करू शकत नाही.