Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीमुळे भाजपा आक्रमक, आघाडीचे नेते म्हणतात, आता का चिडता?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Devendra Fadnavis

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टखाली चौकशी होत आहे. राज्यभर भाजपाने फडणवीसांच्या चौकशीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाने राजकीय सूडबुद्धीतून राज्यातील आघाडी सरकार तसे करत असल्याचा आरोप केला आहे. तर आघाडीच्या नेत्यांनी आजवर विरोधकांची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करणारे भाजपावाले पोलिसांनी साधी चौकशी करतानाच का चिडत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी

  • देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी झाली आहे. मुंबई पोलिसांकडून फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
  • या नोटिशीनुसार देवेंद्र फडणवीस यांना १३ मार्च रोजी मुंबईतील बीकेसीमधील सायबर गुन्हे शाखेसमोर उपस्थित राहायचे होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले “गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त यांचा दूरध्वनी मला आता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात.” असे ते म्हणाले.

भाजपा नेत्यांचं सरकारवर जोरदार टीकास्त्र

  • देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीसबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडी सरकार मनमानी करताना आम्ही मात्र लोकशाही मूल्यं जपतो.

 

भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं की, “घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धी असे तुणतुणे वाजवता. मग घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी? लक्षात असू द्या,झुकणार नाही!”

 

आघाडीवर भाजपा नेत्यांचा सूडबुद्धीचा आरोप

  • महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचं षडयंत्र रचत आहेत.
  • साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. त्यासाठी त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन सभागृहात सादर केले.
  • हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना आहे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत आहे. असा आरोप भाजपाने केला आहे.

 

भाजपा नेते आता का चिडतात?

  • शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांना आरोप करण्याची सवय असून त्यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वच राजकीय नेत्यांनी जबाबदारीनं बोलावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपा केंद्रीय यंत्रणांमार्फत अडकवते आणि आता पोलिसांनी फक्त चौकशीचं म्हटलं, तर का खुपते असा प्रश्न विचारला आहे.

Tags: BJPdevendra fadnavisआशिष शेलारदेवेंद्र फडणवीसभाजपामुंबई पोलिस
Previous Post

देवेंद्र फडणवीसांची पोलिसांकडून चौकशी, भाजपाचा संताप! समजून घ्या काय आहे प्रकरण…

Next Post

“नोटीस देण्याची पद्धत नव्हती, पण जबाबदार व्यक्तींनीही बोलताना भान बाळगावं!” – अजित पवार

Next Post
ajit pawar on devendra fadnavis Inquiry

"नोटीस देण्याची पद्धत नव्हती, पण जबाबदार व्यक्तींनीही बोलताना भान बाळगावं!" - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!