Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याच्या नोटीशीमुळे राजकारण तापलं

December 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा अडचणीत आले आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतोष परब हल्ला प्रकरण कारण ठरलंय. या प्रकरणात त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्यावर आरोप झाले आहेत. पोलीस त्यांचा शोधही घेत आहेत. पण न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करून नितेश राणे गायब झाले आहेत. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, नारायण राणे यांनी मला माहित आहे, पण तुम्हाला का सांगू? असे पत्रकारांनाच दटावले. त्याची दखल घेत पोलिसांनी त्यांनाच नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती पोलिसांना देण्यासाठी ही नोटीस आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे.
  • नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.
  • तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
  • यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे.
  • प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.

 

नितेश राणेंचा संबंध नाही मारहाणीशी- नारायण राणे

  • नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्यानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झाली असून, त्यामुळेच नितेश राणेंना एका प्रकरणात अटक करण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
  • नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शोध घेत आहेत.
  • यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, ‘पोलीस एवढे का आले, याची माहिती घ्या.
  • काय टेररिस्ट आले की पाकिस्तानातून कोणी आलं?
  • एक खरचटलं…मारहाण झाली मग एवढे पोलीस का? अशा घटना घडत असतात.
  • नितेश राणेंचा संबंध नाही मारहाणीशी.
  • नाव गोवायचं आणि ३०७ लावायचं, निवडणूक संपेपर्यंत डांबून ठेवायचा असा यांचा प्लॅन आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
  • दरम्यान, आता याप्रकरणी राणेंना नोटीस बजावल्याने हे प्रकरण अजून तापणार आहे.

CRPC 160 कलम नेमकं कशासाठी? खरंच केंद्रीय मंत्र्यांना पोलीस नोटीस बजावू शकत नाहीत?

 


Previous Post

CRPC 160 कलम नेमकं कशासाठी? खरंच केंद्रीय मंत्र्यांना पोलीस नोटीस बजावू शकत नाहीत?

Next Post

राज्यात ८५ ओमायक्रॉनचे नवे रुग्ण रिपोर्ट! एकूण २५२ पैकी ९९ रुग्ण बरे!

Next Post
MOR Maharashtra Omicron Report

राज्यात ८५ ओमायक्रॉनचे नवे रुग्ण रिपोर्ट! एकूण २५२ पैकी ९९ रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!