मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा अडचणीत आले आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतोष परब हल्ला प्रकरण कारण ठरलंय. या प्रकरणात त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्यावर आरोप झाले आहेत. पोलीस त्यांचा शोधही घेत आहेत. पण न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करून नितेश राणे गायब झाले आहेत. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, नारायण राणे यांनी मला माहित आहे, पण तुम्हाला का सांगू? असे पत्रकारांनाच दटावले. त्याची दखल घेत पोलिसांनी त्यांनाच नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती पोलिसांना देण्यासाठी ही नोटीस आहे.
नेमकं प्रकरण काय?
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे.
- नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.
- तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे.
- प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.
नितेश राणेंचा संबंध नाही मारहाणीशी- नारायण राणे
- नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्यानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झाली असून, त्यामुळेच नितेश राणेंना एका प्रकरणात अटक करण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
- नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शोध घेत आहेत.
- यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, ‘पोलीस एवढे का आले, याची माहिती घ्या.
- काय टेररिस्ट आले की पाकिस्तानातून कोणी आलं?
- एक खरचटलं…मारहाण झाली मग एवढे पोलीस का? अशा घटना घडत असतात.
- नितेश राणेंचा संबंध नाही मारहाणीशी.
- नाव गोवायचं आणि ३०७ लावायचं, निवडणूक संपेपर्यंत डांबून ठेवायचा असा यांचा प्लॅन आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
- दरम्यान, आता याप्रकरणी राणेंना नोटीस बजावल्याने हे प्रकरण अजून तापणार आहे.
CRPC 160 कलम नेमकं कशासाठी? खरंच केंद्रीय मंत्र्यांना पोलीस नोटीस बजावू शकत नाहीत?