मुक्तपीठ टीम
पिंपरी-चिंचवड ट्रॅफिक पोलिसांनी जानेवारी २०२१ मध्ये पुण्यातल्या बिनॉय गोपालन यांना २०० रुपयांचा दंड आकारला होता. गोपालन यांची दुचाकी अधिकृत पार्किंग क्षेत्रात होती. मात्र, पार्किंगच्या ट्रॅफिक साईनवरुन तिथे संभ्रम होता. त्यादिवशी गोपालन यांच्यासह अनेकांना दंड भरावा लागला.
बिनॉय गोपालन यांनी वाहतूक पोलिस कार्यालयात अनेक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी वाहतूक पोलिस आयुक्तालयाविरोधात गुन्हा दाखल केला आणि असंख्य सुनावणीनंतर त्यांनी ट्रॅफीक पोलिस अधिकाऱ्यांना आपली चूक मान्य करण्यास भाग पाडलं. तसंच त्यांच्याविरूद्ध जारी केलेले ऑनलाईन चलान मागे घेण्यास भाग पाडलं. पिंपरी-चिंचवड वाहतूकमधले एसीपी श्रीकांत डिस्ले यांनीही ही चूक मान्य केली.