Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रात्रीच्या अंधारात पोलीस मदतीला धावले, गर्भवती महिलेची सुखरुप प्रसुती

January 10, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Gangapur police station

पोलिसांविषयीची एक बातमी वर्दीतील अनलिमिटेड माणुसकीचं दर्शन घडवणारी आहे. नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मदतीमुळे एका गरोदर महिलेची सुखरुप प्रसुती शक्य झाली आहे.

 

नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नीतीन पवार, हवालदार उगले, कॅान्स्टेबल गिरीश महाले आणि राहुल सोलसे हे मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर हद्दीत दुचाकीवर पेट्रोलिंग करत होते. त्यांना अचानक पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगापूर गावातील रस्त्यावर चार लोक दिसले. त्यांची चौकशी केली तर भारती जाधव या महिलेला प्रसूती वेदना होत होत्या आणि ती मदतीसाठी विनवणी करत होती. तिचे वृद्ध सासू-सासरे  मदतीसाठी याचना करत होते.

 

गंगापूर पोलीस ठाण्याचे एपीआय नितीन पवार यांनी सांगितले की,  भारती जाधव या महिलेला पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी प्रसूती वेदना होऊ लागल्या, त्यांच्या घरापासून त्या सासू-सासऱ्यांसह जवळजवळ एक किलोमीटर चालत गेल्या होत्या. त्यावेळेस वाहन मिळण्याची शक्यता कमी होती. परंतु, गर्भवती महिलेची चालण्याची स्थिती नव्हती. त्यावेळेस तिचे पतीही शहराबाहेर होते.

 

त्यानंतर पवार यांनी तातडीने पोलिसांची गस्तीची गाडी मागविली. भारतीची गिरनारे ग्रामीण रुग्णालयात नोंद झाली असल्याने पोलीस गाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बाहेर काढावी लागली, म्हणूनच गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांना पवार यांनी फोन करून परिस्थितीची माहिती दिली. आंचल मुदगल यांनी गस्त घालणाऱ्या पथकाला तातडीने त्या महिलेस ९ किलोमीटर लांब असलेल्या गिरनारे ग्रामीण रुग्णालयात नेण्याची सूचना केली.

 

भारती यांना पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पोलीस आयुक्त दीपक पांडे,  डीसीपी अमोल तांबे, एसीपी दीपाली खन्ना यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त असल्याचे पवार म्हणाले. भारती यांना रुग्णालयात तातडीने वेळेवर घेऊन जाताना, कॅान्स्टेबल गिरीश महाले आणि राहुल सोलसे यांनी धीर देऊन महत्त्वाची भूमिका बजावली.

 

लिंक क्लिक करा, पाहा व्हिडीओ:


Tags: Gangapur Police Thanenashik cityगंगापूर पोलीस ठाणेनाशिक
Previous Post

कॉमेडियन कपिल शर्माची फसवणुक केल्याप्रकरणी दिलीप छाब्रियाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्रात ८८% शाळा पुन्हा उघडल्या; १६ लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती

Next Post
School reopen

महाराष्ट्रात ८८% शाळा पुन्हा उघडल्या; १६ लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!