अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा मुंबई पोलिसांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप वारंवार करत आहे. आपल्याला कारागृगात अत्यंत वाईट वागणूक मिळत असल्याचे त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहून आरोप केले. मात्र त्यांचा हा खोटारडेपणा मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून उघड केला आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त संजय पांडे?
संजय पांडे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून खार पोलीस स्टेशनमधील एक सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहे. १२ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत राणा दाम्पत्य चहा पिताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे. आणि ‘आम्ही अजून काही बोलायचं का? असे कॅप्शन दिले आहे.
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022
नवनीत राणांनी काय आरोप केले?
- नवनीत राणा आणि रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली.
- यानंतर नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.
- मागासवर्गीय असल्याने इतरजण वापरत असणाऱ्या ग्लासमधून पाणी दिलं नाही असा आरोप करत त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं.
- तसेच दलित असल्याने बाथरुमही वापरू दिला नाही.
- जातीवरून हिणवत माझा छळ करण्यात आला.
- मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली.