Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“हा अर्थसंकल्प छोटेखानी अर्थसंकल्पांच्या मालिकेतील एक”

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निवेदन

January 31, 2021
in सरकारी बातम्या
0
PM Narendra Modi

मुक्तपीठ टीम

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दशकातील पहिल्या अधिवेशनात दशकाचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी या सत्रात संपूर्ण दशक लक्षात घेऊन चर्चा व्हाव्यात, सर्व प्रकारचे विचार मांडले जावेत आणि विचार मंथनातून अमृत प्राप्ती व्हावी अशी देशाची अपेक्षा आहे, असे मत मांडले.

तसेच कोरोना संकटामुळे 2020 मध्ये एक नव्हे तर अर्थमंत्र्यांना वेगवेगळ्या पॅकेजच्या स्वरुपात एका प्रकारे चार- पाच छोटेखानी अर्थसंकल्प द्यावे लागले, असा त्यांनी खास उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, 2020 मध्ये एका प्रकारे या छोटेखानी अर्थसंकल्पांची मालिका सुरूच राहिली. या अर्थसंकल्पाकडेही त्या चार-पाच छोटेखानी अर्थसंकल्पांतली मालिका म्हणूनच पहिले जाईल याचा मला विश्वास आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन त्यांच्याच शब्दात:

 

Speaking at the start of the Budget Session. https://t.co/qhQMTEXOsG

— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2021

नमस्कार मित्रहो,

संसदेचे  या दशकातले  हे पहिले अधिवेशन सुरु होत आहे. भारताच्या उज्वल भविष्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयाने झपाटलेल्या  सर्वांनी जी स्वप्ने पाहिली, ती स्वप्ने, ते संकल्प वेगाने साकारण्यासाठी ही सुवर्ण संधी देशाकडे आली आहे. या दशकाचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी या सत्रात संपूर्ण दशक लक्षात घेऊन चर्चा व्हाव्यात, सर्व प्रकारचे विचार मांडले जावेत आणि विचार मंथनातून अमृत प्राप्ती व्हावी अशी देशाची अपेक्षा आहे.

देशाच्या कोट्यवधी जनतेने ज्या आशा-अपेक्षांसह आपल्याला संसदेत निवडून दिले आहे, त्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी, संसदेच्या या पवित्र स्थानाचा उपयोग करत, लोकशाहीच्या सर्व मर्यादांचे पालन करत, आपले योगदान देण्यात आपण मागे राहणार नाही याचा मला विश्वास आहे.  सर्व खासदार हे सत्र अधिक उत्तम करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.

हे अर्थसंकल्पीय अधिवेशनही आहे. भारताच्या इतिहासात कदाचित हे प्रथमच घडले असेल की 2020 मध्ये एक नव्हे तर वित्त मंत्र्यांना वेगवेगळ्या पॅकेजच्या स्वरुपात एका प्रकारे चार- पाच छोटेखानी अर्थसंकल्प द्यावे लागले. म्हणजेच 2020 मध्ये एका प्रकारे या छोटेखानी अर्थसंकल्पांची मालिका सुरूच राहिली. या अर्थसंकल्पाकडेही त्या चार-पाच छोटेखानी अर्थसंकल्पांतली मालिका म्हणूनच पहिले जाईल याचा मला विश्वास आहे.

मी पुन्हा एकदा आदरणीय राष्ट्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली, संसदेच्या दोन्ही सदनाच्या खासदारांसह त्यांचा संदेश पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे.

खूप- खूप धन्यवाद.


Tags: budgetcentral budgetNarendra modiPM Narendra modiअर्थसंकल्पकेंद्रीय अर्थसंकल्पनरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

दिल्लीत शेतकरी आंदोलनस्थळी हल्ला, शेतकऱ्यांच्या आवश्यक वस्तूंची तोडफोड, संघर्षात पोलीसही जखमी

Next Post

‘बेस्ट’ला सर्व ताकद देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला शब्द

Next Post
udhav thackarye

'बेस्ट’ला सर्व ताकद देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला शब्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!