Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीत शेतकरी आंदोलनस्थळी हल्ला, शेतकऱ्यांच्या आवश्यक वस्तूंची तोडफोड, संघर्षात पोलीसही जखमी

शेतकरी आंदोलकांना हुसकावण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न

January 31, 2021
in घडलं-बिघडलं
0
Goons attack farmers -1

मुक्तपीठ टीम

दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी काही हल्लेखोरांनी घोषणाबाजीसह हल्ला केला. गेले कित्येक दिवस सुरु असलेल्या कृषी कायद्यांविरोधी शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आज दुपारी १ वाजता सिंघू सीमेवर गोंधळ झाला. काही लोक अचानक शेतकरी आंदोलन स्थळी पोहचले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांकडे सीमा भाग मोकळा करण्याची मागणी केली. त्यांच्यातील गुंडांनी शेतकऱ्यांच्या आवश्यक वस्तूंची तोडफोड करायला सुरूवात केली. त्यानंतर शेतकरी आणि तोडफोड करणाऱ्यांमध्ये झटापट झाली. दोन्ही बाजूंनी परस्परांवर दगडफेकही करण्यात आली. शेतकरी आंदोलकांनी सीमाभाग मोकळा करावा, अशी हल्लेखोरांची मागणी होती. त्यांच्या आंदोलनामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

 

शेतकरी आंदोलक आणि स्थानिकांच्या झटापटीत पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्याचा माराही करावा लागला. या झटापटीत ५ पोलीस जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी स्थानिक आणि शेतकरी एकमेकांना भिडण्याआधी किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते सतनाम सिंह पन्नू यांनी केंद्र सरकारवर सीमेवरील वातावरण बिघडवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाचे वातावरण बिघडवले आहे. पण, कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही”.

 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंघू सीमेवर सुरक्षा दलांचा ताफा वाढवण्यात आला आहे. सर्व बाजूंनी भक्कम बॅरिकेड्स उभारले आहेत. तर टिकरी सीमेवरही सुरक्षेसाठी मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. कारण, या दोन्ही सीमा या शेतकरी आंदोलनाच्या केंद्रबिंदू आहेत.

ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर गेल्या २ दिवसांपासून पोलीस कारवाई करत होते. यामुळे, गाझीपूर सीमेवरील शेतकरी आंदोलन संपुष्टात येऊ शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी रात्री उशिरा दिलेल्या भावनिक संदेशानंतर हे आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे.


Tags: attack on farmersFarmer Delhi Protestदिल्ली शेतकरी आंदोलनशेतकरी आंदोलन
Previous Post

पहिल्या चालकरहित ‘मेड इन इंडिया’ मेट्रो कोचचं मुंबईत अनावरण

Next Post

“हा अर्थसंकल्प छोटेखानी अर्थसंकल्पांच्या मालिकेतील एक”

Next Post
PM Narendra Modi

"हा अर्थसंकल्प छोटेखानी अर्थसंकल्पांच्या मालिकेतील एक"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!