Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात, देहू आणि मुंबईत कार्यक्रम!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pm Modi Visit Maharashtra Today

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे. पंतप्रधान मोदी प्रथम जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर आणि मूर्तीच्या लोकर्पाण सोहळ्यासाठी पुण्यातील देहूत येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी हे मुंबईतील कार्यक्रमांसाठी रवाना होतील. पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा कसा असेल हे जाणून घेऊया…

असा असेल पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा

  • दुपारी १२
    देहू येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करतील.
  • सायंकाळी ४.४५
    पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं लोकार्पण करतील.
  • संध्याकाळी ६
    पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचार या गुजराती दैनिकाच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.

पंतप्रधान मोदींचा देहू दौरा!

  • नरेंद्र मोदींच्या हस्ते आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
  • आज दुपारी साधारण १२ च्या सुमारास पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करणार आहेत.
  • त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत.
  • साधारण दीड ते दोन तास हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
  • या कार्यक्रमासाठी ५० हजारांच्या आसपास वारकरी येणार असल्याचे संस्थानाकडून सांगण्यात आले आहे.
  • याशिवाय पंतप्रधानांना देण्यासाठी संस्थांकडून खास पगडी तयार करण्यात आली आहे.
  • पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला आहे.
  • तसेच, स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
  • सध्या मंदिर परिसरात फक्त पास धारकांनाच प्रवेश दिला जात आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते जल भूषण इमारत आणि क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन!

  • यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील.
  • जल भूषण इमारत हे १८८५ सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे.
  • जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधण्यात आली आहे.
  • सन २०१६ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते.
  • शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटिश या भुयाराचा उपयोग करत होते.
  • २०१९ साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले.
  • या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय असून मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार!

  • पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचार या गुजराती दैनिकाच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील.
  • हे वृत्तपत्र गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे.
  • या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल.

Tags: DehuMaharashtramumbaiPM Narendra modiTukaram Maharajदेहूपंतप्रधान नरेंद्र मोदीमहाराष्ट्रमुंबईसंत तुकाराम महाराज
Previous Post

त्वचा रोग ओळखण्यासाठी आता स्मार्ट फोन होणार डॉक्टर! एम्सचा स्मार्ट शोध!

Next Post

दिव्यांगांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणारे ‘सार्थक’चे हायब्रीड मॉडेल

Next Post
Sarthak

दिव्यांगांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणारे 'सार्थक'चे हायब्रीड मॉडेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!